
Cyber Crime News | नागपूर पोलीस आयुक्त आणि भंडारा पोलीस अधीक्षकांचे ‘फेक प्रोफाईल’, सायबर गुन्हेगारांपासून सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Cyber Crime News | सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminals) अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) अनेकांचे फेक प्रोफाईल तयार करुन त्याद्वारे पैशांची मागणी (Demand Money) केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सायबर गुन्हेगारांकडून केवळ सामान्य नागरिकच नाही तर पोलिसांचे देखील फेक प्रोफाईल (Fake Profile) तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. (Cyber Crime News) नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Nagpur CP Amitesh Kumar) आणि भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी (Bhandara SP Lohit Matani) यांचे फेसबुकवर फेक प्रोफाईल तयार केल्याचे समोर आले आहे. यानंतर या अधिकाऱ्यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती देऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सोशल माध्यामांवर सक्रीय असतात. फेसबुकवर त्यांचे प्रोफाईल असून त्यावर त्यांनी त्यांचा तपशील टाकला आहे. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रोफाईल फोटोचा वापर करुन अज्ञात व्यक्तीने त्यांचे फेक प्रोफाईल तयार केले व अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. अमितेश कुमार यांचेच प्रोफाइल असल्याचा समज झाल्याने अनेकांनी त्यांचा स्वीकार देखील केला. हा प्रकार अमितेश कुमार यांच्या लक्षात येताच त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. (Cyber Crime News)
अमितेश कुमार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, तोतयागिरी करुन अज्ञात व्यक्तीने माझे बनावट फेसबुक खाते
(Facebook Account) तयार केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
आरोपी माझे प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटो वापरुन लोकांना फसवण्याचा प्रयत्नात आहेत.
त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सत्यता पडताळून पहा. या बनावट खातेधारकाला कोणीही वैयक्तिक माहिती देऊ नका.
तसेच कुणीही माझा संदर्भ देणाऱ्यांशी किंवा इतर कुणाशीही आर्थिक व्यवहार करु नका,
असे आवाहन अमितेश कुमार यांनी केले आहे.
दरम्यान, अशाच पद्धतीने भंडारा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचे देखील फेसबुकवर फेक अकाउंट उघडण्यात आले आहे.
याबाबत लोहित मतानी यांनी फेसबुकवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
माझ्या नावावर अज्ञात व्यक्तीने एक बनावट खाते उघडले आहे. तो माझ्या मित्रांकडे पैशांची मागणी करत आहे.
कृपया त्याला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन लोहित मतानी यांनी केले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update