Cyrus Mistry | डेटा रेकॉर्डर चिप उघड करणार कार दुर्घटनेचे रहस्य? जर्मनीत मर्सिडीज करणार डिकोड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cyrus Mistry | टाटा सन्सचे (Tata Sons) माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई पोलिसही मिस्त्री यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. महाराष्ट्रातील पालघर पोलिसांनी कार कंपनीला अनेक प्रश्न विचारले आहेत. सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

 

जर्मनीला पाठवणार चिप
सर्व प्रश्नांची उत्तरे कार कंपनीची टीम आपल्या रिपोर्टमध्ये देईल. कार कंपनीने पालघर पोलिसांना सांगितले आहे की गाडीची डेटा रेकॉर्डर चिप जर्मनीला पाठवण्यात येणार आहे. जर्मनीमधून डीकोड केल्यानंतर एसयूव्हीबद्दल अधिक तपशील उपलब्ध होतील. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता? अपघाताच्या वेळी ब्रेक, एअर बॅग आणि इतर भाग कसे काम करत होते? चिप डीकोड केल्यानंतर ही सर्व माहिती उपलब्ध होईल. (Cyrus Mistry)

 

वेळेचे गणित आणि विविध सीसीटीव्हीच्या फुटेजवरून गाडीचा वेग कळणार आहे. अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, हे डाटा रेकॉर्डरवरून कळेल.

 

अनेक पैलूंचा तपास करत आहेत पोलीस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायरस मिस्त्री इतरांसोबत रविवारी दुपारी 1.25 वाजता उदवाडावरुन निघाले होते. त्यांच्या कारला 2.28 च्या सुमारास अपघात झाला. यावरून समजते की त्यांनी सुमारे 60 ते 65 किलोमीटरचे अंतर 1 तास 2 मिनिटांत कापले. मिस्त्री यांची गाडी वाटेत थांबली होती की गाडी भरधाव वेगाने जात होती, याचाही तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Cyrus Mistry | cyrus mistry accident chip sent to germany police ask car questions from manufacturer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Krushi Utpanna Bazar Samiti Maharashtra Elections | राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

 

Pune Crime | नगरसेवकाकडे 25 लाख रुपये खंडणी मागणारा RTI कार्यकर्ता जितेंद्र भोसलेवर गुन्हे शाखेकडून FIR

 

BJP MLA Gopichand Padalkar | श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल