डी.जी. म्हैसेकर पुणे विभागाचे प्रभारी विभागीय आयुक्त

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

राज्य शासनाने पुणे विभागीय प्रभारी आयुक्त पदी डॉ. दीपक जी. म्हैसेकर यांची नियुक्ती केली आहे. डॉ. म्हैसेकर हे लवकरच प्रभारी आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकाणार आहेत. माजी पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. आज (बुधवारी) त्यांची नेमणूक करण्यात आल्याने विभागाला तात्पुरते आयुक्त मिळाले आहेत.

डॉ. म्हैसेकर हे ‘नासुप्र’ला (नागपूर सुधार प्रन्यास) पूर्णवेळ सभापती म्हणून कार्यरत होते. तसेच नांदेड महापालिका आयुक्त म्हणून त्यांनी ४ वर्षे काम पाहिले. त्यानंतर नगरविकास विभागाचे उपसचिव म्हणून काम केले. कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. ते मागील ३ वर्षांपासून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होते. डॉ. म्हैसेकर २००३ च्या बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस आहेत.