Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dacoity With Arms In Shirur Pune | शिरुर तालुक्यातील आरगणगाव येथे पहाटे एक ते दोनच्या दरम्यान ठोंबरे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेल्याची घटना घडली. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलाबाई आनंद ठोंबरे (वय-65) या गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडल्या (Dacoity With Murder). आनंदा सावळाराम ठोंबरे (वय-79) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Dacoity With Arms In Shirur Pune)

याबाबत आनंदा ठोंबरे यांचा मुलगा बाबा ठोंबरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shirur Police Station) फिर्य़ाद दिली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील आरणगाव येथे ठोंबरे वस्तीवर ठोंबरे दाम्पत्य राहते. दरोडेखोरांनी वस्तीवरील इतर दरवाजांना बाहेरुन कडी लावून घेतली. फुलाबाई व त्यांचे पती झोपलेल्या खोलीमध्ये दरोडेखोर शिरले. त्यांनी ठोंबरे दाम्पत्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फुलाबाई ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंदा ठोंबरे यांच्या डोक्यात धारदार वस्तूने मारहाण केली.

यावेळी ठोंबरे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जागे झाल्याने दरोडेखोर दागिने घेऊन अंधाराचा फायदा घेऊन
पळून गेले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला.
दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली असून सीसीटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा
माग काढण्यात येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On BJP | भाजपने पक्ष फोडताना पवार कुटुंबही फोडले; रोहित पवार यांची खंत

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)