Dadasaheb Phalke Award 2023 | दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार संपन्न ; ‘या’ चित्रपटाने पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

पोलीसनामा ऑनलाइन : यंदाचा 2023 ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2023)’ वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. हा पुरस्कार भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञान, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येतो. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकार आणि दूरचित्रवाणी वर्तुळातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय कलाकारांना पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2023) देण्यात आले.

एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ आणि विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांना यंदाचा दादासाहेब आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. तर फिल्म ऑफ द इयर हा पुरस्कार ‘RRR’ या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. तर ‘द काश्मीर फाइल्स’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार (Dadasaheb Phalke Award 2023) देण्यात आला. ‘द काश्मीर फाइल्स’ला पुरस्कार मिळाल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा पुरस्कार सर्व दहशतवाद पीडितांना आणि देशातील लोकांना समर्पित केला.

यंदाच्या 2023 दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड मध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी रेखा, अनुपम खेर, आलिया भट्ट, ऋषभ शेट्टी, वरुण धवन, श्रेयस तळपदे, रोहित रॉय यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर ‘गंगुबाई काठीयावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री आलिया भट्टला प्रदान करण्यात आला. तर ‘ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूरची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर म्हणून ‘कांतारा’ चित्रपटातील अभिनेता ऋषभ शेट्टीची निवड करण्यात आली. तर वरुण धवनला भेडिया’साठी क्रिटिक्स बेस्ट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तर ‘द काश्मीर फाइल्स’साठी मोस्ट व्हर्सटाइल अ‍ॅक्टर म्हणून अभिनेते अनुपम खेर यांची निवड करण्यात आली. तर रेखा यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल गौरवण्यात आले.

विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे :

सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स
Best Director सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट, आर बाल्की
सर्वोत्कृष्ट अभिनेता: ब्रह्मास्त्र, रणबीर कपूर,
Best Actress सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: गंगूबाई काठियावाडी, आलिया भट्ट
मोस्ट प्रॉमिसिंग अ‍ॅक्टर: कांतारा, ऋषभ शेट्टी

चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 पुरस्कार: रेखा

सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस
समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)
वर्षातील सर्वोत्तम चित्रपट: RRR
Television Series of the Year वर्षातील दूरदर्शन मालिका: अनुपमा
वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: काश्मीर फाइल्ससाठी अनुपम खेर
टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: फना-इश्क में मरजावानसाठी, झैन इमाम
सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन, मैय्या मैनु
सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान

Web Title :-  Dadasaheb Phalke Award 2023 | dadasaheb phalke awards 2023 the kashmir files wins the best film award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’