Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभेतील (Legislative Assembly) शिवसेना पक्ष कार्यालय (Shiv Sena Party Office) शिंदे गटाने (Shinde Group) ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील (Parliament) शिवसेना पक्ष कार्यालय (Shiv Sena Party Office) शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांना पत्र लिहून उपसचिव सुनंदा चॅटर्जी (Deputy Secretary Sunanda Chatterjee) यांनी ही माहिती दिली आहे.

संसदेच्या भवनात शिवसेना पक्षाला जे कार्यालय (Shiv Sena Party Office) मिळाले आहे. ते शिंदे गटाकडे देण्यात यावे, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यांची ही मागणी लगेच मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता संसदेमधील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला मिळाले आहे.

या कार्यालयात संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई (Anil Desai) आणि प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना प्रवेश मिळण्याची शक्यता नाही. जर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला हे तिन्ही नेते मानत असतील तर त्यांना कार्यालयात प्रवेश दिला जाईल अशी भूमिका संसदीय पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. हाच निर्णय विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यासह लोकसभेतील पाच खासदारांबाबत घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) नाट्यमय घडामोडीनंतर संसदेतील शिवसेनेचे कार्य़ालय शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वापरले जात होते.
सत्तासंघर्षाचा वाद सुरु असताना देखील दोन्ही गटाचे खासदार एकाच कार्यालयात बसत होते.
मात्र आता ही मालकी पूर्णपणे लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला दिली आहे.
जो प्रकार सोमवारी विधानसभेच्या पक्ष कार्यालयात घडला तोच प्रकार मंगळवारी संसदेत घडला.
संसदेतील शिवसेनेचे कार्यालय हे शिंदे गटाला देण्यात आले.

Web Title :-  Shiv Sena Party Office | shivsena office in parliament under the control of shinde group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’