Dagdusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya 2022) श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात (Dagdusheth Ganpati) गणेशाला 11 हजार आंब्यांचा महानेवैद्य (Amba Naivedyam) आज दाखविण्यात आला. या आंब्यांची (Mango) सुरेख आरास बाप्पाच्या चरणी करण्यात आली आहे. (Dagdusheth Ganpati)

 

ADV

 

आंबा महोत्सवानिमित्ताने मंदिरामध्ये पहाटे ४ ते ६ प्रसिद्ध गायिका आशाताई खाडिलकर (Ashatai Khadilkar) यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ वाजता गणेश याग करण्यात आला आहे. दुपारी १२.३६ या मुहूर्तावर श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा होणार आहे. रात्री ९ वाजता भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

 

गणेशाच्या चरणी करण्यात आलेली आंब्यांची आरास पाहण्यासाठी आणि अक्षयतृतीयेनिमित्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आज सकाळपासून मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. तसेच ही आरास आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यास भाविक दंग असल्याचे दिसून येत आहे. (Dagdusheth Ganpati)

 

महानेवैद्याचे हे आंबे उद्या ससूनमधील रुग्ण (Sasoon Hospital), अनाथाश्रम, वृद्धाश्रम,
दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधु आंबेवाले (Desai Bandhu Ambewale)
यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीयेला हा महानेवैद्य दाखविला जातो.

 

Web Title :- Dagdusheth Ganpati | 11,000 mangoes amba mahanaivedyam to Dagdusheth Halwai Ganpati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा