Sambhaji Raje On Raj Thackeray | ‘रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही’ – खासदार संभाजीराजे छत्रपती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhaji Raje On Raj Thackeray | मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरुन राज्यातील राजकारण तापलं असल्याचं दिसतं. औरंगाबादमधील (Aurangabad) सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) बांधली, असं विधान केलं होतं. आता यावरुनही वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. “राज यांचं वक्तव्य इतिहासाला धरून नाही. राज ठाकरेंनी अभ्यास करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी बांधली, हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं,” खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी म्हटलं आहे. (Sambhaji Raje On Raj Thackeray)

 

खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, ”इतिहास ज्यावळी आपण मांडतो, त्यावेळी त्यातील शंभर टक्के माहीत असेल तरच आपण बोललं पाहिजे. नाही तर त्याला हातसुद्धा लावू नये. मी इतकंच सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही टिळकांनी बांधलेली नाही,” असं मत त्यांनी मांडलं आहे. (Sambhaji Raje On Raj Thackeray)

 

”महात्मा ज्योतिबा फुले पहिल्यांदा समाधीजवळ गेले. त्यांनी पूजा केली.
त्यामुळे समाधी कुणी बांधली यांचं श्रेय कुणा एका व्यक्तीचं नसून सर्व शिवभक्तांचं आहे.
महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा आणि सर्व महापुरुषांचा आहे. त्यामुळे बेकारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न महाराष्ट्रात आहे, त्यावर लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे.
यावर आपण बोललं पाहिजे. त्याच त्याच विषयांवर किती बोलायचं, मला त्यात पडायचं नाही,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

दरम्यान, ”संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाळ आजच्या दिवशी संपत आहे.
यावरुन ते म्हणाले, राजकारण मला लागू नव्हतं. पण इथून पुढे राजकारणात उतरायचं आहे, हे निश्चित आहे.
त्यामुळे दिल्ली (Delhi) आणि महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात मी रमतो. दोन्हीकडे माझा संपर्क वाढलेला आहे.
त्यामुळे दिल्ली आणि महाराष्ट्र दोन्ही डोळ्यांसमोर ठेवून राजकारणात सक्रिय होणार असल्याचं,” ते म्हणाले.

 

Web Title :- Sambhaji Raje On Raj Thackeray | MNS Chief raj thackerays statement is wrong lokmanya tilak did not build samadhi of chhatrapati shivaji maharaj on raigad claims sambhaji raje chhatrapati

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा