दौंड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थिनींना मोफत सायकल

अब्बास शेख

दौंड  :  पोलीसनामा ऑनलाईन – दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये राहणाऱ्या ६६५ विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती  राणी शेळके यांनी दिली.

मोफत सायकली मिळणाऱ्या गावांमध्ये धायगुडेवाडी, बोरीपार्धी, काळे वस्ती, धुमाळ वस्ती, आलेगाव,  जाधव वस्ती, वरवंड, केडगाव, नानगाव, वडगाव दरेकर, पाटस, हातवळण, यवत, नंदादेवी, गिरीम, पेडगाव, शिरापूर, उंडवडी, खोर, पडवी, दापोडी, पिंपळगाव, गार, बेटवाडी, लिंगाळी, बोरिभडक, बोरीऐंदी, कासुर्डी, गोपाळवाडी यांसह इतर गावांच्या विध्यार्थीनींचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणला असून त्याची कामे सध्या प्रगती पथावर आहेत. याबाबत सभापती राणी शेळके यांनी बोलताना जिल्हापरिषदेचा मिळणारा निधी हा दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, बारामती विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे उपलब्ध होत असल्याचे सांगितले.