जागतिक स्तरावर भारताचा ‘आवाज’ बनणार DD इंटरनॅशनल, BBC आणि CNN च्या धर्तीवर इतर देशांमध्ये होणार ‘ब्यूरो’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत करण्यासाठी प्रसार भारतीने दूरदर्शन इंटरनॅशनल चॅनेल लाँच करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. डीडी इंटरनॅशनल चॅनेलचा मुख्य हेतू सामायिक विषयांवर भारताबाबत जागतिक मीडियाच्या एकांगी दृष्टीकोणाला जोरदार उत्तर देत भारताची योग्य प्रतिमा सादर करणे हा आहे.

प्रसार भारती बोर्डाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर दूरदर्शनने डीडी इंटरनॅशनलला स्वरूप देण्यासाठी कन्सल्टंटची नियुक्ती करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. बोर्डाने कन्सल्टंट नियुक्त करण्यासाठी जागतिक निविदा मागवली आहे. 28 मेपर्यंत टेलिव्हिजन ब्राडका स्टग क्षेत्रात सल्लागार कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अमेरिकेच्या सीएनएन न्यूज चॅनेल आणि बीबीसी या चॅनेलवरून दूरदर्शनच्या आंतरराष्ट्रीय चॅनेलची गरज गेल्या काही काळापासून असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाकडून पक्षपातही होत असल्याचे दिसले आहे.

देशातील एकमेव सरकारी ब्रॉडकास्टर प्रसार भारती दूरदर्शनच्या चॅनेलच्या माध्यमातून सर्वात मोठा टीव्ही प्रसारक आहे. दूरदर्शन आता हिंदी आणि इंग्रजी या भाषांशिवाय देशातील सर्व प्रमुख क्षेत्रीय भाषांचा 91 टीव्ही चॅनेलचे प्रक्षेपण करतो. जगभरातील प्रसिद्ध पत्रकार-स्तंभलेखकांनाही डीडी इंटरनॅशनलच्या कार्यक्रमांशी जोडण्याची योजना आहे.