6 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा विहिरीत आढळला मृतदेह, माहेरच्यांनी केला घातपाताचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या 6 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या विवाहितेचा (married girl) विहिरीत मृतदेह आढळला आहे. पढेगाव (ता. कोपरगाव) परिसरात गुरुवारी (दि. 3) सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे विवाहितेने (married girl) आत्महत्या  केल्याची चर्चा सुरु असतानाच तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या  केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसानी चहूबाजूंनी तपास सुरु केला आहे.

कोविशील्डची निर्मिती करणार्‍या ‘सीरम’चा DCGI कडे अर्ज, म्हणाले – ‘Sputnik V लसीच्या उत्पादनासाठी परवानगी द्या’

पुजा सागर मापारी (वय 24) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजाचे लग्न 6 महिन्यांपूर्वीच झाले होते.
लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक अन् शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. तसेच आमच्या मुलीने आत्महत्या Suicide केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहरेच्यांनी केला आहे. या प्रकरणी आरोपींना तातडीने शिक्षा करावी, अशी मागणीही मारेच्यांनी केली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव करत आहे.

.

Chandrakant Patil : शरद पवार हे सगळयांचे गॉडफादर, म्हणूनच…

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले