बेपत्ता मेडिकल स्टोअरचालकाचा मृत्यू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन

गेली दोन दिवस बेपत्ता असलेल्या मेडिकल स्टोअरचालकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रफुल्ल पुरुषोत्तम कांबळे (३०, रा. मिचार्पूर, ता.तिवसा) असे त्यांचे नाव आहे. ही घटना फे्रजरपुरा हद्दीतील मार्डी रोडवरील अच्युत महाराज रुग्णालयापासून काही अंतरावर घडली. शवविच्छेदन अहवालात प्रफुल्लचा मृत्यू विषाने झाल्याचे स्पष्ट असले तरी त्याने विष घेतले की पाजण्यात आले, याबाबत संशय आहे. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ff0b444-b733-11e8-a8d3-d5a478ca38a3′]

प्रियकराने प्रेयसीचा केला खून

प्रफुल्ल कांबळे याचे कुऱ्हा येथे माउली मेडिकल प्रतिष्ठान असून, वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले. ते ९ सप्टेंबर रोजी आईसोबत एका एमआर मित्राच्या मोपेडने बहिणीची प्रकृती पाहण्यासाठी राजापेठ स्थित डॉ. बोंडे हॉस्पिटलला गेला. तेथून रात्री १० वाजता बाहेर पडला आणि मोपेडने गावाकडे निघाला होता. मात्र, त्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाइकांना त्याचा शोध लागला नाही. त्यामुळे राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्रफुल्लचा मृतदेह मार्डी रोडलगत बुधवारी आढळून आला. रस्त्यालगत प्रफुल्लचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला. घटनास्थळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. त्याची मोपेड झुडुपात आढळली. डिक्कीत सोन्याची चेन, काही पैसे व औषधी होत्या. यावरून त्याच्या हत्येचा कट आखल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार करुन हल्लेखोराची आत्महत्या

शवविच्छेदनात विषामुळे मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. कांबळे यांच्या शरीरावर जखमा किंवा गळा आवळल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे हा वेगळा काही प्रकार आहे. विष पाजून हत्या केल्यावर मृतदेह फेकून दिला असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचे कोणाबरोबर वाद होते का यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.