जेनेटिक इंजिनियर्सचा दावा : 2045 पर्यंत मरण होणार ऐच्छिक, वाढत्या वयाचा उपचार होणार ‘शक्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बार्सिलोनामध्ये दोन जेनेटिक इंजिनियर्सने आपल्या नव्या पुस्तकाच्या प्रेझेंटेशनदरम्यान दावा केला की, 25 वर्षानंतर मरणे ऐच्छिक आणि वय वाढण्यापासून रोखणे उपचार करण्यायोग्य होईल. व्हेनेझुएलामध्ये जन्मलेले जोस लुई आणि केंब्रिजचे गणिततज्ज्ञ डेविड वुड ’सिम्बियन’ ऑपरेटिंग सिस्टमचे फाऊंडर आहेत.

अमर राहाणे वैज्ञानिक शक्यता
हे दोन्ही जेनेटिक इंजिनियर आहेत आणि या दोघांनी ’द डेथ ऑफ डेथ’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अमर राहाणे एक वास्तविक आणि वैज्ञानिक शक्यता आहे, जी मुळरूपात विचार करण्याच्या तुलनेत खुप अगोदर येऊ शकते. कोरडॅरो आणि वुडचे म्हणणे आहे की, 2045 च्या जवळपास माणसांचा मृत्यू केवळ दृर्घटनांमध्ये होईल, कोणत्याही नैसर्गिक कारणाने होणार नाही.

त्यांचे म्हणणे आहे की, हे दुर्भाग्य आहे की वृद्धत्वाचे एखाद्या आजाराप्रमाणे वर्गीकरण केले जाते. जेणेकरून या उपचारासाठी सार्वजनिक आर्थिक पोषण वाढवता येईल. इतर नव्या अनुवंशिक बदलाच्या तंत्रज्ञांनात नॅनो टेक्नोलॉजी प्रमुख आहे.

या प्रक्रियेत खराब जीन निरोगी जीनमध्ये बदलता येतील, शरीरातून मृतपेशी नष्ट करणे, नष्ट पडलेल्या पेशींना ठिक करणे, स्टेम सेलमध्ये उपचार आणि महत्वाच्या अवयवांना 3डी मध्ये प्रिंट करण्याचा समावेश आहे. अमेरिकेच्या मॅसाचुसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नालॉजीमधील पदाधिकारी कोरडॅरो यांचे म्हणणे आहे की, त्यांनी न मरण्याचा निर्णय केला आहे आणि 30 वर्षानंतर ते आजच्या तुलनेत जास्त तरूण असतील.

एजिंग, डीएनए टेल्सचा परिणाम आहे, त्यांना टेलोमेरेसच्या नावाने ओळखले जाते, जे क्रोमोसोम्समध्ये असतात. यांच्यात लाल रक्त आणि सेक्स पेशींना सोडून प्रत्येक पेशींच्या 23 जोड्या आहेत, ते छोटे होऊ लागतात. तर वाढते वय रोखण्यासाठी टेलोमेरेसला लांब करावे लागते. काळाच्या ओघात टेलोमेरेस कमजोर होतात आणि नुकसानग्रस्त होतात. असे तेव्हा आणखी वेगाने होते जेव्हा व्यक्ती धूम्रपान, दारू आणि वायु प्रदूषणाला बळी पडतो. यामध्ये टेलोमेरेसची लांबी कमी होते आणि यामुळे माणूस वेगाने वृद्ध होत जातो.

कोरडॅरो आणि वुडचे म्हणणे आहे की, दहा वर्षात कँसरसारखा आजार बरा होऊ लागेल. इंजिनियर्सने सांगितले की, पण सामान्यपणे लोकांना याबाबत माहिती नसते, परंतु 1951 मध्ये याचा शोध घेतला घेतला गेला होता की, कशाप्रकारे कँसर सेल्स अमर होतात. जव्हा हेनरिकेटा लॅक्सचा मृत्यू सर्वायकल कँसरने झाला, सर्जनने ट्यूमर काढून टाकला आणि ते ठेवून दिला आणि तो आजही जिवंत आहे.

जपान आणि कोरिया सारख्या देशात जर मुले जन्माला न घालण्याची पद्धत अशीच राहीली तर हे देश 200 वर्षात लुप्त होतील. कोरडॅरोने म्हटले की, 200 वर्षानंतर पृथ्वीवर कुणीही जपानी आणि कोरियन समाज नसेल. परंतु या नव्या तंत्रज्ञानाचे मोठे आभार, वास्तवात जपानी आणि कोरियन लोक नेहमीसाठी राहतील आणि तरूण बनूण राहतील.

स्मार्टफोन एवढा खर्च
जेनेटिक शास्त्रज्ञांनी म्हटले की, अँटी एजिंगच्या उपचाराचा खर्च तेवढाच असेल, जेवढी किंमत सध्याच्या काळात एखाद्या नवीन स्मार्टफोनची आहे. सुरूवातीला हा उपचार महाग जरूर असेल, परंतु एका कालावधीनंतर याचा खर्च कमी होईल, कारण याचा सर्व लोकांना फायदा मिळेल.

कोरडॅरो यांनी सांगितले की, जेव्हा एखाद्या तंत्रज्ञानाचा शोध लागतो तेव्हा ते महाग असते, परंतु काही काळानंतर मुख्य प्रवाहात आल्यानंतर ते स्वस्त होते. या दोन इंजिनियर्सने सांगितले की, ते बेकायदेशीरपणे दोन वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहेत.

त्यांची पहिली रूग्ण एलिजाबेथ पॅरिस आहे, तिला वय वाढण्याची लक्षणे जाणवू लागली आणि तिने म्हटले की हे रोखण्यासाठी काय उपचार करता येईल. वुडने सांगितले की, तिचा उपचार खुप जोखमीचा आणि बेकायदेशीर होता, परंतु आता त्या उपचाराचा कोणताही साइड इफेक्ट दिसत नाही आणि तिच्या रक्तात टेलोमेरेसचा स्तर पहिल्याच्या तुलनेत आज 20 वर्ष अगोदरचा आहे.

वुड यांनी सांगितले, मला वाटते की स्पेन अशा तंत्रज्ञानाचे स्थान बनावे आणि सिद्ध करावे की आम्ही वेडे नाही. फक्त एवढेच आहे की लोकांना याबाबत अजून माहिती नाही. या दोन्ही शास्त्रज्ञांचे पुस्तक स्पॅनिश, इंग्लिश, पुर्तगाल आणि कोरियन भाषेत प्रकाशित केले जाणार आहे. याच्या विक्रीतून होणारी कमाई रिसर्चमध्ये लावली जाईल.

You might also like