Deccan Queen Express | डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून उतरताना अपघात, एकाचा मृत्यू; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Queen Express | पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या (Pune Mumbai Railway) डेक्कन क्वीन एक्सप्रेस मधून उतरताना दोघेजण खाली पडले. यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत आणि जखमी दोघेही भाऊ भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी (दि.6) सकाळी 9.30 च्या सुमारास कल्याण स्टेशनवर (Kalyan Railway Station) घडली. सुरुवातीला एक्सप्रेस पकडताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र, एक्सप्रेसमध्ये चढताना नाही तर उतरताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. (Deccan Queen Express)

धावत्या गाडीतून उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न

डेक्कन क्वीन एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. या स्थानकावर गाडीचा वेग थोडा कमी होते. मात्र, धावती एक्सप्रेस पकडण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न अनेक प्रवासी करत असतात. त्यात अनेकवेळा अशा प्रकारच्या दुर्घटना होतात. आजही नेमकं तेच झालं. पुण्यावरुन आलेले दोन भाऊ कल्याण स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ते दोघेही खाली कोसळले. त्यात एकाला जीव गमवावा लागला. मयत व्यक्तीचे नाव नूर अली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये पुण्याहून बसले होते, त्यांना पनवेलला जायचे होते. (Deccan Queen Express)

नेमकं काय घडलं?

पुण्यावरुन मुंबईकडे येणार डेक्क्न क्विन एक्सप्रेस सकाळी 9.30 च्या सुमारास कल्याण स्टेशनवर आली.
यावेळी या रेल्वेचा वेग कमी झाला. त्यादरम्यान काही प्रवाशांनी एक्सप्रेसमध्ये चढण्याचा तर काहींनी उतरण्याचा
प्रयत्न केला. या एक्सप्रेस बाबत हा प्रकार नेहमीच घडतो. आजही तसाच प्रयत्न पुण्यावरुन आलेल्या दोन भावंडांनी केला.
कल्याण स्थानकावर उतरताना दोघे खाली कोसळले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. दरम्यान, ही दुर्घटना स्थानकावरील हमालांनी पाहिली. त्यांनी जखमीला तातडीने रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. नेमकं काय झालं हे कोणालाच लवकर समजलं नाही.

घटना सीसीटीव्हीत कैद

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, जीआरपीएफ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तसेच ही सर्व दुर्घटना प्लॅटफॉर्मवर असलेल्या सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Shahari Garib Yojana | पुणे महापालिका: शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा एक लाख 60 हजारांपर्यंत वाढवली, पण तांत्रिक कारणास्तव महिन्याभरापासून अंमलबजावणीच नाही

Pune Crime News | एटीएम कार्ड चोरून पैसे काढून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी विश्रांतवाडी पोलिसांकडून गजाआड