Deccan Queen Express | पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास होणार वेगवान ! ‘डेक्कन क्वीन’ लवकरच नव्या रंगात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Deccan Queen Express | पुणे-मुंबई (Pune-Mumbai) दरम्यानचा प्रवास लवकरच वेगवान होणार आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणारी ‘डेक्कन क्वीन’ एक्स्प्रेस (Deccan Queen Express) आता नव्या रूपात, नव्या रंगात दिसणार आहे. आणि तिचा वेग देखील वाढणार आहे. यासाठी लागणाऱ्या लिकें हॉफमन बुश (LHB) डब्यांची आणि डायनिंग कारची निर्मिती चेन्नईतील ICF कारखान्यात केलीय. तर हे डबे जानेवारी महिन्यात मुंबईत दाखल होणार आहे. यामुळे आता प्रवाशांना नवीन वर्षामध्ये नव्या डेक्कन क्वीनने प्रवास करता येणार आहे.

 

‘डेक्कन क्वीन’ ही एक्स्प्रेस (Deccan Queen Express) लवकरच नव्या रूपात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने या एक्स्प्रेसला सामान्य डब्याचा रंग न देता हिरवा आणि लाल रंग दिला गेला आहे. ‘डेक्कन क्वीन’ ही हेरिटेज रेल्वे असल्याने अहमदाबाद येथील ‘NID’ने याचे आरेखन केले आहे. चेन्नई येथील कारखान्यात डेक्कन क्वीनचे डबे व डायनिंग कार तयार झाली आहे. तसेच आतापर्यंत 18 डब्यांची निर्मिती पूर्ण झालीय. परंतु, डबे अजुन मुंबईत दाखल झाले नाही. असं रेल्वे विभागाच्या (Railway Department) सुत्राकडून सांगण्यात आलेय. यामुळे डेक्कन क्वीन’चा प्रवास आता जलद आणि सुरक्षित होणार आहे.

दरम्यान, या डब्यांच्या बदलांबाबत प्रवाशांनी काही सूचना रेल्वेला केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने त्या मान्य केल्या नाहीत. तर, या बदलांचे आनंदाने स्वागत केले जाणार आहे. नावलौकीक असलेल्या रेल्वेच्या नवीन कोचचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करावे, अशी मागणीही रेल्वेकडे केली गेली आहे. असं रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा हर्षा शहा (Harsha Shah) यांनी सांगितलं आहे.

 

हे आहेत नवे नियम –

नव्या रूपातील डब्यांना आता हिरव्या व लाल रंगाचा साज

डायनिंग कारची क्षमता 32 ऐवजी आता 40 प्रवाशांची

5 रंगांमधील रंगसंगती असलेली ही देशातील एकमेव गाडी

वेग वाढविण्यासाठी ‘LHB’ डबे बसविण्याचा निर्णय

या डब्यांमध्ये प्रशस्त जागा असून ते वजनानेही हलके

 

Web Title :- Deccan Queen Express | Deccan Queen Express to undergo makeover soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kiara Advani-Sidharth Malhotra | कियारा आणि सिद्धार्थ 2022 मध्ये त्यांचे नाते करणार ऑफिशअल?

Raj Kundra Pornography Case | राजू कुंद्रानंतर शिल्पा शेट्टीनं ट्विट करत दिली सफाई, म्हणाली – ‘सत्य कधी लपत नसतं…’

Multibagger Penny Stock | 3 रुपयांच्या या पेनी स्टॉकने एका वर्षात दिला 4,412 टक्के रिटर्न, तुम्ही खरेदी केला का?