Black Fungus : कोरोनाच्या उपचारादरम्यान महागात पडतेय ‘ही’ चूक, ब्लॅक फंगसचा होतोय ‘उगम’, जाणून घ्या

नवी दिल्ली : कोरोनासह आता ब्लॅक फंगसची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. लोकांच्या मनात याबाबत भीती निर्माण झाली आहे. मात्र, घाबरण्यापेक्षा जास्त जागृत होण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टीट्यूटचे एमडी आणि प्रसिद्ध कार्डियोव्हस्कुलर थोरेसिक सर्जन रमाकांत पांडा यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली आहे. डॉक्टर पांडा यांनी ब्लॅक फंगसबाबत सविस्तर सांगितले की, हा कसा होतो आणि याच्या बचावासाठी कोणत्या पद्धती अवलंबल्या पाहिजेत.

डॉक्टर पांडा यांचे म्हणणे आहे की, ब्लॅक फंगस हा कोणताही आजार नाही. भारतात अनेक लोक यौगिक जलनेती (पाण्याने नाकाची स्वच्छता) करतात. या सरावात बहुतांश लोक पाण्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. अनेक वर्षापूर्वी घाणेरड्या पाण्यामुळे जलनेती केल्याने ब्लॅक फंगसची प्रकरणे समोर आली होती. ब्लॅक फंगस काय आहे जाणून घेवूयात.

ब्लॅक फंगस काय आहे –
या दुर्मिळ संसर्गाला म्यूकोरमायकोसिस सुद्धा म्हणतात. कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांमध्ये हे धोकादायक ठरत आहे. लक्ष न दिल्यास 50-80 टक्के रूग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हे एक फंगल इन्फेक्शन असून त्यांना संक्रमित करते जे कोणत्या तरी आजारामुळे औषधावर आहेत. यामुळे त्यांच्यात रोगाशी लढण्याची शक्ती कमी झालेली असते. अशा लोकांना हवेतून सायनस किंवा फुफ्फुसात संसर्ग पसरतो.

ब्लॅक फंगसची लक्षणे –
हा शरीराच्या कोणत्या भागात पसरला आहे यावर लक्षणे अवलंबून असतात. सामान्यपणे हा सायनस, फुफ्फुसे आणि मेंदूत पसरतो. याची सामान्य लक्षणे नाक बंद होणे, नाकाच्या वरच्या भागवर पापडी जमा होणे, नाकाची त्वचा काळी पडणे. याशिवाय डोळ्यांमध्ये वेदना आणि अस्पष्ट दिसणे सुद्धा लक्षण आहे. हा आजार खुप वेगाने पसरतो. अनेक वर्षापासून हा आजार आहे. पण तो दुर्मिळ आहे.

ब्लॅक फंगसची कारणे –
* मुख्य कारण स्टेरॉईडचा अंदाधुंद वापर
* रूग्णांना मोठ्या कालावधीपर्यंत घाणेरडा ऑक्सीजन देणे
* आयसीयूमध्ये दिर्घकाळ राहणे
* ट्रान्सप्लांट आणि कॅन्सरमुळे याची शक्यता वाढते.

कशापासून धोका –
ब्लॅक फंगस आपल्या घरात आढळतो. ओल्या मातीत म्यूकरच्या संपर्कात आल्याने होतो. सामान्यपणे माती, जनावरांचे शेण, सडलेले लाकूड, झाडांचे साहित्य, खत आणि सडलेली फळे व भाज्यांमध्ये आढळते.

स्टेरलाइज्ड वॉटर
ऑक्सीजनच्या कंटेनरचे पाणी स्टेरलाइज्ड न केल्याने ब्लॅक फंगसची शक्यता वाढते. डॉक्टर पांडा म्हणतात कोविडच्या डायबिटीज आणि विना डायबिटीज रूग्णांना असा ऑक्सीजन मिळाला तर विचार करा काय होत असेल. विना ह्यूमिडिफिकेश केलेला ऑक्सीजन म्यूकस मेंब्रेनला सुकवून फुफ्फुसे खराब करतो.

काय आहेत खबरदारीचे उपाय –
* ऑक्सीजनच्या क्वालिटीकडे लक्ष देणे
* ऑक्सीजन डिलिव्हरीपूर्वी ह्यूमिडिफिकेशसाठी वारंवार स्टेरलाईज्ड आणि डिस्टिल्ड वॉटरचा वापर केला जावा.
* कंटेनरचे सर्व डिस्पोजेबल भाग वारंवार बदलले पाहिजेत.
* स्टेरॉईडचा वापर खुप कमी केला पाहिजे.
* डिस्चार्ज झाल्यानंतर कोरोना रूग्णांनी आपल शुगर लेव्हल सतत तपासणी पाहिजे.
* फंगस ओळखायला शिका.
* किचनमध्ये ठेवलेली फळे, ब्रेड जेव्हा सडतात तेव्हा त्यांना बुरशी लागते. वेळीच ते फेकून द्या.