Deepak Kesarkar | जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा निघाला?, मंत्री केसरकरांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Deepak Kesarkar | मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत. शासकीय नियमांनुसार त्यावर अंमलबजावणी होईल. महाराष्ट्रसच्या इतिहासात पहिल्यांदा आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) दिली. आता आणखी देऊन ही संख्या ५० लाखांच्या वर जाणार आहे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे.

तर दुसरीकडे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी सुमारे तासभर केलेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी वाशी येथे समाजाला निर्णय वाचून दाखवून मग अंतिम निर्णय घेऊ असे म्हटले आहे. तत्पूर्वी, दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मनोज जरांगे हे मागण्या मान्य झाल्याने आंदोलन समाप्त करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दीपक केसरकर यांनी म्हटले की, मुंबई ठप्प होणे हे देशाच्या दृष्टीने योग्य नाही.
मुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. शेवटी प्रथा परंपरेचा मान ठेवणे ही राज्याची संस्कृती आहे. किती अधिकारी भेटायला गेले, किती नेते भेटायला गेले आणि आता सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जरांगे यांनी मान ठेवला पाहिजे, त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटून आनंद नक्कीच साजरा करतील.

तर राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे हे वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचले आहेत.
ते या ठिकाणी समाज बांधवांना निर्णयाबाबत माहिती देतील यानंतर आंदोलन मागे घेतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MPDA Action | येरवडा परिसरातील अट्टल गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 97 वी कारवाई

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल, तरुणावर FIR

Pune News | गुड न्यूज! पुणे, पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता तिसरी महापालिका, जिल्ह्यातील ‘या’ गावांचा समावेश