Deepak Kesarkar | आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांनी दिला सूचक इशारा

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटातील आमदार (Shinde Group MLA) परतीच्या मार्गावर आहेत, असे कोण सांगत असेल तर ती त्यांची स्वप्न आहेत. आण ती दिवास्वप्नेच राहतील, आपले आमदार सांभाळा नाहीतर एक आमदार अगोदरच गेला आहे आता आहे ते जरी गेले तरी कळणार नाही. त्यामुळे चुकीची वक्तव्य करुन नका असा सूचक इशारा मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिला आहे. गुरुवारी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं.

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिक्षकांकडून (Teachers) अतिरिक्त कामे करुन घेत असेल तर ते चुकीचे आहे. शिक्षकांकडे विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी दिली पाहिजे. राष्ट्रीय जबाबदारी (National Responsibility) सोडून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्य़भार दिला जात असेल तर त्याबद्दल आपण निश्चितच पुनर्विचार करु. घडलेल्या त्या प्रकाराची चौकशी केली जाईल. येत्या आठवड्यात बैठक घेऊन तसा अध्यादेश काढला जाईल, चुकीच्या पद्धतीने आदेश देणाऱ्यांची चौकशी केली जाईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

 

प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या विधानाबाबत विचारले असता केसरकर म्हणाले, यासंदर्भात आपल्याला अद्याप पर्य़ंत माहिती नाही. त्यामुळे मी कोणतेही वक्तव्य करणार नाही, माहिती घेऊन निश्चितच बोलेन असा दावा त्यांनी केला.

 

शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर असल्याच्या चर्चांवर बोलताना केसरकर म्हणाले, शिंदे गटातील आमदार जाणार नाहीत.
मात्र कोण दावा करत असेल तर तो पूर्णत:चुकीचा आहे. अशा प्रकारे कोणीही जाणार नाहीत.
वारंवार यापूर्वी दावे केले जात आहेत. परंतु ते त्यांचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

 

Web Title :- Deepak Kesarkar | shinde group mla on the way back in shivsena deepak kesarkar said clearly

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Steel | ट्विन टॉवर पाडणार्‍या कंपनीचे लक्ष आता टाटा स्टीलवर, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण…

 

Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

 

Pune Crime | FTII मध्ये शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या, महिन्याभरातील दुसरी घटना