Ramdas Kadam | ‘मातोश्रीवर किती खोके गेले माहिती, तोंड उघडायला लावू नका’, रामदास कदमांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह राष्ट्रवादी (NCP) – काँग्रेसने (Congress) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर सडकून टीका केली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक आमदाराला 50 खोके मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडी मधील नेत्यांनी केला. पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session) 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणावरुन माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी गंभीर आरोप केले आहेत. मातोश्रीवर (Matoshree) किती खोके जातात, याची माहिती आहे, आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा इशाराच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला आहे.

 

फक्त बोलतात, दुसरं काय योगदान

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी (MLA) मतदारसंघात पाय ठेवून दाखवा असे आव्हान दिलं. पण सगळे आमदार आले. जनतेने त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी माझ्या वरळी मतदारसंघातून (Worli Constituency) जाऊन दाखवा म्हणाले, त्यांच्या नाकावर टिच्चून सगळे आमदार वरळी मतदारसंघातून गेले. मग म्हणाले विधानभवनात (Vidhan Bhavan) पाय ठेवून दाखवा. सगळे आमदार विधानभवनात पोहोचले. ते बोलतात फक्त, दुसरं काय योगदान आहे. काही जमलं नाही आता खोके म्हणतात. मातोश्रीवर किती मिठाईचे खोके गेले ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, असा खळबळजनक आरोप रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला.

 

त्यांना डायबिटीस होत नाही

मातोश्रीमध्ये किती खोके गेले, किती मिठाई खाल्ली तरी त्यांना डायबिटीस होत नाही, सवय झाली आहे. अंगवळणी पडले आहे. त्यांनी दुसऱ्यांकडे बोट दाखवून खोक्याची भाषा वापरावी, यासारखे कोणतही आश्चर्य नाही, असा टोला कदम यांनी लगावला.

 

सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर बसलात

सत्तेसाठी शरद पवारांच्या (Sharad Pawar) मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांची आठवण झाली का, असा सवालही रामदास कदम यांनी केला आहे.
तसेच राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत.
आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी सुरु झाल्या आहेत.
मग सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते, असा सवाल त्यांनी केला आहे.

 

Web Title : –  Ramdas Kadam | how many khoke matoshree receives ramdas kadam allegations on shivsena chief uddhav thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा