Deepak Mankar On Baramati Lok Sabha | मतदार सुनेत्रावहिनींकडे बारामतीचे नेतृत्व देतील असं स्पष्ट दिसतंय, दीपक मानकरांना विश्वास

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Deepak Mankar On Baramati Lok Sabha | आजवर लोकांनी सुप्रियाताईंना संधी दिली, आता लोक वहिनींना संधी देतील. लोकांना पवारांच्या घरगुती मतभेदाच्या संदर्भात काही रस निश्चित नाही. मात्र एकाच कुटुंबातील लोकांच्यात भेदभाव देखील मतदार करणार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले, आता सुनेत्रावहिनी (Sunetra Ajit Pawar) यांच्याकडे मतदार नेतृत्व देतील असे स्पष्ट दिसत आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे. (Baramati Lok Sabha)

दीपक मानकर यांनी म्हटले की, सुप्रीया ताईंना या मतदारसंघाने नेतृत्वाची संधी दिली होती. संसदेत त्यांनी चांगली भाषणे केली, याचे कौतुक मतदारांना निश्चित असेल. पण आता परिस्थिती बदलली आहे. शिवाय काही समस्या मात्र तशाच आहेत. या मतदारसंघात पिण्याच्या पाण्याची समस्या काही ठिकाणी आहे, तसेच इथले लोक रोजगारासाठी बाहेरगावी जातात.

ते पुढे म्हणाले, नवले ब्रिजचा अपघाती ब्रिज म्हणून सारखा उल्लेख होतो, खडकवासल्यात धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी ओरड होत असते. रिंग रोडच्या भू संपादनाचा विषय असेल, पुरंदरच्या विमानतळाचा विषय असेल असे अनेक विषय अजूनही व्यवस्थित हाताळण्याची गरज आहे, असे मानकर म्हणाले.

दीपक मानकर म्हणाले, अजितदादांच्या साथीने वहिनी हे सारे प्रश्न आपल्या पहिल्याच टर्ममध्ये लीलया सोडवू शकतील, असाही विश्वास वाटतो, जो मतदारांमध्ये दिसून येत आहे.

पुणे लोकसभा मतदार संघाबाबत (Pune Lok Sabha) दीपक मानकर म्हणाले, भाजपचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) सहज जिंकतील असा मला विश्वास आहे. भाजपचा प्रमुख विरोधक कॉंग्रेसची अवस्था खूपच कठीण होऊन बसली आहे. ज्या कॉंग्रेसने स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास लिहिला त्या कॉंग्रेसच्या नशिबी अशी अवस्था येणे दुर्दैवी आहे, पण ती आणली कोणी याचा विचार याही निवडणुकीत पुन्हा स्पष्ट होईल.

पुणे काँग्रेसवर टीका करताना दीपक मानकर पुढे म्हणाले, कॉंग्रेसकडे परंपरागत मतदार होता आणि आहे. पण तो दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. याचे आत्मपरीक्षण कोणी करत नाही. कॉंग्रेसला भाजपने संपविले नसून कॉंग्रेसला कॉंग्रेसच्याच नेत्यांनी संपविले आहे असे माझे मत आहे.

मानकर म्हणाले, आज बदललेला कॉंग्रेस भवनाचा चेहरा पहा, तो कोणताही सज्जन माणूस, मग तो पुरुष असो कि स्त्री असो, त्यांना भावणार नाही. कॉंग्रेसचा जुना कार्यकर्ताही आता कॉंग्रेस भवनला जायला नको म्हणतो. सगळीकडे नुसती ठेकेदारांची बजबजपुरी दिसून येते.

दीपक मानकर म्हणाले, एका मराठा आयएएस अधिकाऱ्याला कानफटात लगावणे, चप्पल फेकून मारणे असे प्रकार ठेकेदारांनी याच कॉंग्रेसच्या सहाय्याने येथे केले. हे मराठा समाज विसरणार नाही. पवार साहेबांनी येथे नेतृत्व सोपविलेल्या तथाकथित नेत्याचे जे आज गुणगान गात आहेत, त्याने नेमके राजकारण कसे नासविले ते गाडगीळ आणि टिळकच जाणून नाहीत तर उभ्या देशाला संबधित नेत्याचे कर्तुत्व ठाऊक आहे.

त्याच्यानंतर तर सामुहिक नेतृत्वाने आणखीच बजबजपुरी करून ठेवली. त्यांच्यात जणू रेसच लागली आणि या रेसमध्ये ते सामान्य जनतेपासून दूरवर गेले. म्हणून भाजपचा पर्याय लोकांनी स्वीकारला. अजूनही कॉंग्रेसमध्ये निष्ठेला, प्रामाणिकपणाला योग्य सन्मान नाही आणि किंमत नाही. XXX मेहरबान तो XXX पहिलवान, अशा अवस्थेत येथे निवडणुका होत आहेत, असा हल्लाबोल दीपक मानकर यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar On Ajit Pawar | ‘तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे’, रोहित पवारांची अजित पवारांवर चौफेर टीका

Murlidhar Mohol | मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार – मुरलीधर मोहोळ