Murlidhar Mohol | मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार – मुरलीधर मोहोळ

पुणे : Murlidhar Mohol | मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा (Swargate Chowk) कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार असून, उद्योग व्यवसायांना गती मिळणार असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha) भाजप महायुतीचे (Mahayuti BjP Candidate) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

मोहोळ यांच्या प्रचारार्थ आज पर्वती मतदारसंघात (Parvati Vidhan Sabha) तुळशीबाग कॉलनी, तळजाई वसाहत, चव्हाण नगर, पद्मावती, शिवदर्शन परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, श्रीनाथ भिमाले, करण मिसाळ, राजू शिळीमकर, सुभाष जगताप, श्रीकांत पुजारी, अनिल जाधव, गणेश घोष, विशाल पवार, श्रुती नाझीरकर, विकास कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Murlidhar Mohol)

मोहोळ पुढे म्हणाले, या प्रकल्पामुळे भुयारी मेट्रो आणि स्वारगेटचे एसटी स्थानक एकमेकांशी जोडले जाणार आहे.
मेट्रोच्या मल्टिमोडल हबमध्येच पीएमपीचे राजश्री शाहू बस स्थानक होणार आहे.
कुठूनही कुठे जाण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी एकाच ठिकाणी मिळणार आहे.
हबमध्ये व्यावसायिक जागा विकसित केल्या जाणार आहे.
मॉल, मल्टिफ्लेक्स आणि इतर व्यवसायासाठी जागा दिली जाणार. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार