Rohit Pawar On Ajit Pawar | ‘तिकडे मलिदा गँग, इकडे जनता अशी निवडणूक आहे’, रोहित पवारांची अजित पवारांवर चौफेर टीका

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Rohit Pawar On Ajit Pawar | तिकडे मलिदा गँग आहे आणि इकडे जनता आहे. त्यामुळे जनता विरुद्ध नेता अशी लढत होईल. साडेतीन लाख ते चार लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडून येतील. पक्ष चोरीला गेला चिन्ह चोरीला गेले. लोकसभेच्या सहा महिने आधी ती सगळी यंत्रणा चोरीला गेली. ती सगळी यंत्रणा दादा स्वत:साठी वापरत आहेत. ज्या मैदानावर गेली 40 वर्ष सभा होते ते मैदानही चोरीला गेले आहे. आता सगळेच चोरीला जात असले तरी लोकांचा विचार चोरीला जाऊ शकत नाही, तोच विचार आणि तिच ताकद आणि वजय हा तुतारीचा झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ते बारामतीत बोलत होते. यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांवर चौफेर टीका केली. (Baramati Lok Sabha)

त्यांना आवाका माहित असता तर…

रोहित पवार म्हणाले, विचार आणि परंपरा जपण्याची जबाबदारी सगळ्यांची असते. दादा पलीकडे का गेले संपूर्ण दुनियेला माहित आहे. जर दादांना साहेबांचा आवका माहित असेल तर त्यांचा प्रश्न आहे. मात्र, त्यांना आवाका खरचं माहिती असता तर दादांनी पवार साहेबांची साथ सोडली नसती. आम्ही का लढतोय हे आम्हाला माहित आहे ते सत्तेसाठी गेले ते त्यांना माहित आहे. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत ते त्याच्यासाठी लढत आहे. आमच्यासाठी विचार महत्त्वाचे आहेत म्हणून आम्ही विचारासाठी लढत आहोत.(Rohit Pawar On Ajit Pawar)

एवढे बदललेले दादा आम्ही पाहिलेले नाहीत

तिथून पैसा ताकद दबाव तंत्र मोठ्या प्रमाणावर असू शकते. इथे सामान्य नागरिक, स्वाभिमानी लोक आणि आम्ही
सगळेजण पवार साहेबांच्या बरोबर आहोत. पैशाची ताकद मोठी की लोकांची ताकद मोठी हे लवकरच समजेल.
अजितदादांचे पूर्वीची भाषणे काढावी लागतील. त्यामध्ये ते स्वत: म्हणाले आहेत की, सुप्रिया सुळे यांचे काम चांगले आहे.
दादा जर आता काही वेगळे बोलत असतील ते पूर्वी बोलले त्याच्या उलट बोलत असतील एवढे बदलेले दादा आम्ही पाहिले
नाहीत. आजचे भाजपच्या भूमिका सांगणारे दादा हे बदलेले दादा आता सोसायटीमध्ये प्रचार करू लागलेत.
गल्लीबोळात प्रचार करु लागेले आहेत, अशा शब्दात रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया