Deepali Sayed | शिवसेनेसाठी दिपाली सय्यद यांचं पंतप्रधानांना साकडं; म्हणाल्या – ‘PM मोदी साहेबांचा शब्द उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद जास्तच वाढत जात असताना या दोघांनी एकत्र यायला पाहिजे अशी आशा दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना (Shivsena) जोडून लढली तर शिवसैनिकांना आनंद आहे. यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मध्यस्थी करावी अशी आशा दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी व्यक्त केली आहे.

 

दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकांना आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदे साहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरुन मा. नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे.

 

https://twitter.com/deepalisayed/status/1545025040059887617?s=20&t=ZWn5uFF1OxtIB_ccoCcZkg

 

एकनाथ शिंदे आदरणीय
दीपाली सय्यद यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आदरणीय राहतील अशी भूमिका स्पष्ट केलीय. मला माननीय एकनाथ शिंदे साहेब कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत आणि उद्याही राहतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या आमदारांना ढाल समजून किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि दोन भाजपचे वाचाळवीर आदरणीय
उद्धव ठाकरे व शिवसेनेवर टीका करतील तर त्यांना एवढच सांगणे आहे की आमच्यातील शिवसेना आजही जिवंत आहे.
उघाच कळ काढू नका. आदरणीय शिंदे साहेबांनी भाजपवर (BJP) दाखवलेल्या विश्वासाला तडा देऊ नका.
भाजप आमची शत्रू नाही आणि त्यांच्या विरुद्ध आम्हाला बोलण्यास आनंद नाही.
मात्र वाचाळवीरांना माफी मिळणार नाही. भविष्यात काय होईल माहीत नाही पण भाजपने याची दखल घेणे
गरजेचे आहे, असं दिपाली सय्यद म्हणाल्या.

 

Web Title :- Deepali Sayed | deepali sayed shivsena leader ask senior leaders and narendra modi to talk with uddhav thackeray and eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

GST | नॉन – ब्रँडेड खाद्यान्न वस्तूंवर लगू होणार्‍या GST संदर्भात शुक्रवारी राज्यव्यापी व्यापारी परिषद

 

Aditya Thackeray | ‘गद्दार हे गद्दार असतात, ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दार उघडे’ – आदित्य ठाकरे

 

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा