’गहराइयां’ मध्ये Deepika Padukone च्या सोबत दिसली बहिण Anisha, चाहत्यांनी शोधून काढलं छायाचित्रं

नवी दिल्ली : Deepika Padukone-Anisha | दीपिका पदुकोणचा ’गहराइयां’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक शकुन बत्रा (Director Shakun Batra) यांनी या रिलेशनशिप ड्रामामधील प्रत्येक दृश्यातील बारकाव्यांकडे पूर्ण लक्ष दिले आहे. पण चाहत्यांची नजर शकुनपेक्षा तीक्ष्ण असल्याचे दिसतेय. एका चाहत्याने दीपिका पदुकोणची बहीण अनिशा पदुकोणला चित्रपटात स्पॉट केले आहे. (Deepika Padukone-Anisha)

 

’गहराइयां’च्या एका सीनमध्ये अलीशाच्या (दीपिका) बालपणीची छायाचित्रे दाखवण्यात आली आहेत. काही फोटोफ्रेममध्ये अलिशा तिच्या आईसोबत तर काहींमध्ये वडिलांसोबत आहे. एका छायाचित्रात अलिशा तिची चुलत बहीण टिया (Ananya Pandey) सोबत आहे.

 

 

विशेष म्हणजे, या चित्रपटातील अलिशा आणि टियाच्या बालपणीच्या फोटोसाठी दीपिकाच्या खर्‍या आयुष्यातील फोटोचा वापर केला आहे. या फोटोमध्ये ती टिया नसून दीपिकाची खरी बहीण अनिशा पदुकोण आहे. (Deepika Padukone-Anisha)

 

’गहराइयां’मध्ये दीपिकाची बहीण अनिशा

चाहत्यांच्या तीक्ष्ण नजरेतून हे छायाचित्रं सुटले नाही. एका फॅनने चित्रपटाचा स्क्रीनशॉट आणि दीपिका-अनिशाचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. लिहिले आहे, गहराइयांमध्ये ही गोष्ट आवडली, अनिशा आणि दीपिका पदुकोणचे पोट्रेट कौटुंबिक पोट्रेटमध्ये ठेवले आहे.

 

यावर एका यूजरने कमेंट केली की, ’ही दीपिकाची कल्पना होती की डायरेक्टरची हे मला माहीत नाही पण जेव्हा असे काही घडते तेव्हा मला ते खूप आवडते. कॉकटेलमध्ये वडिलांसोबत दीपिकाचा हा फोटो आणि गहराइयांमध्ये अनिशासोबतचे हे छायाचित्र.’

 

अनिशा पदुकोण ही गोल्फपटू

अनिशा पदुकोणला शोबिझच्या जगापासून दूर असलेल्या खेळांमध्ये रस आहे. ती एक व्यावसायिक गोल्फर आहे. ’गहराइयां’ चित्रपटाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे लोकांनी कौतुक केले आहे.

 

Web Title :- Deepika Padukone-Anisha | deepika padukone sister anisha in gehraiyaan fan spot her in picture

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा