Deepika Padukone | स्टाईलिश एअरपोर्ट लुकसाठी दीपिका घेते खूप मेहनत; बॅगमध्ये आवर्जून ठेवते काही गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण ही नेहमी हटके स्टाईलिश लूक मध्ये दिसून येते. तिचा आऊटफिट वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल दीपिका तो व्यवस्थितपणे कॅरी करते. दीपिकाच्या एअरपोर्ट लुकची (Deepika Padukone Airport look) तर सर्वत्र चर्चा असते. सर्व तरुणी दीपिकाच्या या लुकवर फिदा असतात. कम्फर्टेबल व स्टाईलिश एअरपोर्ट लुकसाठी अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) नावाजली जाते. मात्र तिच्या या एअरपोर्ट लुकसाठी खूप मोठी टीम मेहनत घेत असते. तिच्या एका लूक साठी किंवा एका स्टाईलिंगसाठी तिची पूर्ण टीम कामाला लागलेली असते.

अभिनेत्री दीपिका पादुकोण ही सध्या बॉलीवुडमधील अभिनेत्रींमध्ये वरच्या स्थानावर आहे. तिने बॉलीवुडबरोबरच हॉलीवुडमध्येही (Deepika Padukone In Hollywood) अभिनयाची छाप उमटवली आहे. अभिनेत्री दीपिका ही अनेक आंतरराष्ट्रीय शो मध्ये व रेड कार्पेटवर (Deepika Padukone On Red Carpet) दिसून येते. यावेळी तिने परिधान केलेल्या स्टाईलिश लुकची सर्वत्र चर्चा होत असते. त्याचबरोबर तिचे एअरपोर्ट लूक देखील लोकप्रिय आहेत. एका मुलाखती दरम्यान दीपिकाने सांगितले की तिच्या एका लुकसाठी तिची टीम खूप मेहनत घेते. दीपिका तिचा एअरपोर्ट लूक आधीच ठरवत असते. तिने सांगितले की, ‘मी माझ्या एअरपोर्ट लूक अगोदरच ठरवते. मी कुठे जात आहे हे मला माहीत असल्यामुळे मी माझा लूक त्यानुसार निवडते. मला आरामदायक आणि स्टायलिश देखील वाटेल असे मी लूक करते.”

नेहमी मोठी स्माईल व हेअर फ्लिप देणारी अभिनेत्री दीपिका ही पापाराझींकडून कॅमेऱ्यात प्रत्येकवेळी कैद केली जाते. यावेळी नेहमी ती तिच्यासोबत स्टाईलिश (Deepika Padukone Stylish Look) बॅग कॅरी करते. दीपिकाची ही मोठी बॅग तिच्या लुकला पूर्ण करते. मात्र या भल्यामोठ्या बॅगमध्ये काय सामान असते असे दीपिकाला विचारण्यात आले. यावर तिने सांगितले की प्रवासात लागणारे सर्व सामान ती तिच्या जवळ ठेवते. प्रवासातील सामान हे ती आठवणीने घेते. यामध्ये तिच्या अत्यावश्यक गोष्टींचा समावेश असतो. दीपिकाच्या बॅगमध्ये (Deepika Padukone Bag) तिचे वॉलेट व रुमाल हा नेहमी असतोच. त्याचबरोबर मोबाईल चार्जर देखील ती कधीच विसरत नाही. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पादुकोण ही तिच्या जवळ स्क्रीन केअरमधील सनस्क्रीन नेहमी सोबत ठेवते. व सतत वापरत असते.

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) मोठा चाहता वर्ग असून तिच्या लाईफ अपडेट जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. दीपिकाच्या एअरपोर्ट लुकच्या सर्व तरुणी तसेच काही अभिनेत्री देखील चाहत्या आहेत. यासाठी किती मेहनत तिची टीम करते हे तिने सांगितले आहे. दीपिकाचा या वर्षी ‘पठाण’ चित्रपट (Pathan Movie) प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. लवकरच ती ‘जवान’ चित्रपटात (Jawan Movie) देखील झळकणार आहे. याचबरोबर दीपिका पादुकोण प्रोजेक्ट के (Project K) व फायटर (Fighter) सिनेमामध्ये ही झळकणार आहे. दीपिकाच्या आगामी बीग बजेट चित्रपटांची (Deepika Padukone Upcoming Movie) तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Web Title : Deepika Padukone | deepika padukone airport look takes much energy of her stuff ranveer singh wife during travailing carry with her these things in her suitcase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Monsoon Session | शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन बाळासाहेब थोरात- देवेंद्र फडणवीस आमनेसामने, विरोधकांची घोषणाबाजी

Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्‍या ‘मजनू’ला दाखविली कोठडी

Parineeti Chopra And Raghav Chadha | परिणीती व राघव चड्ढा यांनी लग्नाआधी घेतला मोठा निर्णय

Siddharth Jadhav | लाखो रुपये कमवणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ‘ही’ होती पहिली कमाई