Siddharth Jadhav | लाखो रुपये कमवणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ‘ही’ होती पहिली कमाई

पोलीसनामा ऑनालाइन – मराठी सिनेविश्वातील (Marathi Cinema) एक स्टाईलिश व एनर्जेटिक कलाकार असलेला आपला सिद्धू अर्थात अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा यशाच्या शिखरावर आहे. त्याने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिद्धार्थ जाधव याने आपल्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक चित्रपट गाजवले आहेत. आज लाखो रुपयांचे मानधन घेणारा सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने शुन्यातून त्याचे विश्व निर्माण केले आहे. त्याची पहिली कमाई ही फक्त काही ‘शे’ रुपये होती.

अभिनेता सिद्धार्थ जाधव हा आगामी चित्रपट ‘अफलातून’ च्या (Afalatun Movie) माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे तो जोरदार प्रमोशन करत असून दरम्यान एका मुलाखतीमध्ये सिद्धूने त्याच्या पहिल्या कमाई (Siddharth Jadhav First Earnings) विषयी सांगितले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने सांगितले की तो शाळेत असताना अंध-मित्र आणि मैत्रिणींसाठी पेपर लिहायला जायचा. याचा मोबदला म्हणून सिद्धू पहिल्यांदा 500-1000 रुपयांचा चेक मिळाला होता. हा त्याचा जरी पहिला चेक असला तरी ही त्याची पहिली कमाई नव्हती असे त्याने सांगितले. त्याने अभिनयाच्या माध्यामातून मिळालेले मानधन (Siddharth Jadhav Fees) ही त्याची कमाई असल्याचे सांगितले.

कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनेता सिद्धार्थ जाधव याने एकांकिका स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरुवात केली. या स्पर्धांमधून त्याला अभिनयाची गोडी निर्माण झाली व यामध्येच करिअर करण्याचा निर्धार सिद्धूने केला. सिद्धार्थ जाधवने सांगितले की, स्पर्धा करत असताना दरम्यान मला ‘तुमचा मुलगा करतो काय’ हे व्यावसायिक नाटक मिळालं. या नाटकाची नाईट दोनशे रुपये होती. त्यामुळे दोनशे रुपये ही माझी पहिली कमाई आहे. पहिल्या कमाईचे पैसे मी आईला दिले होते”.

यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याची घोडदौड आजतागायत सुरु आहे. त्याने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिद्धार्थने जत्रा (Jatra), साडे माडे तीन (Saade Maade Teen), दे धक्का (De Dhakka), मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (Me Shivajiraje Bhosale Boltoy), धुराळा (Dhurala) अशा हिट चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागो मोहन प्यारे (Jago Mohan Pyaare), तुमचा मुलगा करतोय काय, लोच्या झाला रे (Lochya Zaala Re) आणि गेला उडत (Gela Udat) अशा नाटकांमधून रंगभूमी देखील गाजवली आहे. तो बॉलीवुडच्या सिंबा (Simmba) चित्रपटातही झळकला होता. आता सिद्धार्थचा नवा ‘अफलातून’ चित्रपट येत्या 21 जुलैला प्रेक्षकांच्या (Afalatun Movie Release Date) भेटीस येणार आहे.

Web Title :  Siddharth Jadhav | actor siddharth jadhav reveals his first income know Entertainment News

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rahul Kalate | ठाकरेंना पुन्हा धक्का; राहुल कलाटे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार

Threat Call To Gadkari | नितीन गडकरींना धमकी देणारा अफसर पाशाला 5 दिवसाची पोलीस कोठडी

Weather Forecast IMD Alert | देशात आठवडाभर पावसाचा जोर कायम; महाराष्ट्रातही 5 दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून ‘अलर्ट’