Maharashtra Monsoon Session | शेतकर्‍यांच्या मुद्यावरुन बाळासाहेब थोरात- देवेंद्र फडणवीस आमनेसामने, विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राज्याच्या पावसाळी अधिवेशनला सोमवार (दि.17) पासून सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांना विविध मुद्यांवरुन घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी केली आहे. अधिवेशनाला सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवीन मंत्र्यांची ओळख सभागृहाला करुन दिली. यानंतर पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) दालनात प्राप्त झालेल्या सर्व निवेदन नाकारल्याची माहिती दिली. यावरुन विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिल्यानंतर थोरात म्हणाले, राज्यात पावसाची (Maharashtra Rain) स्थिती गांभीर्याने पाहायची गरज आहे. 50 टक्के क्षेत्रात अद्याप पाऊस झाला नाही. 20 टक्के पेरण्या झाल्या असून शेतकरी (Farmers) हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी (Heavy Rain), गारपीट यानेही शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कांद्याचे अनुदानही मिळालेले नाही. बियाणे, खते मोठ्या प्रमाणात आले आहेत. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात मदत पाठवतो असा शब्द शेतकऱ्यांना दिला. मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. (Maharashtra Monsoon Session)

बोगस बियाणे (Seeds), खते (Fertilizers) मोठ्या प्रमाणावर बाजारात आलेले आहेत. सरकारी टोळी हप्ते वसुली करत आहे. मात्र, दुर्दैवाने सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे कुणाचे लक्ष नाही. मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion), खातेवाटप, दिल्ली वारी यामुळे सरकारचे शेतकऱ्यांचे लक्ष नाही. त्यामुळे सभागृहात स्थगन प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे
शासनाला गांभीर्य आहे. राज्यात काही भागात पाऊस कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
पुणे (Pune Division), नाशिक विभागात (Nashik Division) पेरण्या कमी झाल्या आहे.
IMD चा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या आठवड्यात चांगला पाऊस दाखवण्यात आला आहे.
पेरण्या झाल्या नाही, दुबार पेरणीची वेळ आली तर सरकारने (State Government) त्याचे नियोजन केले आहे.
10 हजार कोटी रुपये गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना मदत केली आहे. काही शेतकऱ्यांची केवायसी (KYC) पूर्ण केली नसल्याने त्यांना
मदत मिळू शकली नाही. ते देखील काम सुरु आहे.

बोगस बियाणे खाते याविरोधात आणखी कडक कायदा करण्याचा सरकारचा विचार आहे.
जी काही बोगसगिरी होत आहे तो दखलपात्र गुन्हा (FIR) केला जाईल. यातील दोषींना जामीन मिळणार नाही अशी कठोर तरतुदी
या कयद्यात करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात काल मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात बैठक झाली असून योग्य
त्या उपाययोजना आणि निर्णय घतल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.

Web Title : Maharashtra Monsoon Session | devendra fadnavis balasaheb thorat face to face in the vidhan sabha on the issues of farmers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rahul Kalate | ठाकरेंना पुन्हा धक्का; राहुल कलाटे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार

Threat Call To Gadkari | नितीन गडकरींना धमकी देणारा अफसर पाशाला 5 दिवसाची पोलीस कोठडी

Weather Forecast IMD Alert | देशात आठवडाभर पावसाचा जोर कायम; महाराष्ट्रातही 5 दिवस मुसळधार, हवामान खात्याकडून ‘अलर्ट’