‘डिप्रेशन’वर दीपिका पादुकोणचा ‘खोटा’ खेळ, रणबीर कपूरला केलं ‘बदनाम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डिप्रेशनविषयी बोलताना दीपिका पादुकोण आता रणबीर कपूरसोबतच्या तिच्या ब्रेकअपविषयी बोलणार नाही. जेव्हापासून दीपिका पदुकोण सिंगचा तिचा एक्स बाॅयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचा संबंध पुन्हा चांगला झाला आहे, तेव्हापासून दीपिकाने तिच्या खराब पास्टबद्दल खोटे बोलण्यास सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल की दीपिकाने काय खोटे बोलली आहे? नैराश्याबाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविणार्‍या दीपिकाने नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांशी झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले की, ती जेव्हा डिप्रेशनदरम्यान होती तेव्हा तिची पर्सनल लाईफ चांगली होती.

दीपिकाने २०१५ साली डिप्रेशनवर विधान केले, ज्यात तीने रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती असे सांगितले होते. दीपिकाने म्हटले होते की संबंध तोडल्यानंतर मला समजले की मी कोणत्याही माणसाशी इतके प्रेमळ होऊ नये. ब्रेकअपनंतर मी खूप रडले. अगदी एकटेपणा टाळण्यासाठी मी स्वत:ला पूर्णपणे व्यस्त ठेवले. परंतु तरीही मला त्या दिवसांत स्वत:ला रिकामे वाटत होते.

दीपिका ५ वर्षांपूर्वीपर्यंत तिच्या डिप्रेशनसाठी रणबीर कपूरला जबाबदार धरत होती. आजकाल ती तिच्या डिप्रेशनच्या काळात रणबीरशी असलेल्या चांगल्या संबंधांबद्दल बोलत आहे. गेल्या काही दिवसांत दीपिकाचे रणबीरशी असलेले नाते पाहिले असता, असे दिसतेय की दीपिका रणबीरने दिलेल्या जखमांना विसरली आहे. परंतु असा प्रश्न देखील निर्माण होतो की  दीपिका त्यावेळी खोटे बोलत होती की आता खोटे बोलत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –