Cannes 2019 : दीपिकाच्या ‘त्या’ ड्रेसवरुन चाहत्यांची नजर हटेना

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  फ्रान्स मध्ये चालू असलेल्या कान फेस्टिवल मध्ये दीपिकाचा पहिला फोटो मीडिया समोर आला आहे. दीपिकाने सोशल मीडियावर तिचा लुक शेयर केला आहे. दीपिकाचा ड्रेस, हेयर स्टाइल आणि मेकअप बघून असं वाटत आहे की तिने यासाठी खूप तयारी केली आहे. दिपीका ऑफ व्हाईट कलरचा गाउन घालून आली आहे. या गाउनमुळे तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपिकाने तिचा ड्रेस पीटर डुंडास या डिझायनर कडून पाहिजे तसा ड्रेस बनवून घेतला. ड्रेस वर दीपिकाने हाई पोनी टेल घातली आहे. रिव्हर्स कॅट आय मेकअप ने दीपिकाचा लुक बदलला होता. दीपिकाच्या फोटोवर तिचा पती रणवीर सिंहने कंमेंट केली आहे. Elegance की Moorat! असे रणवीरने कंमेंट मध्ये लिहिले आहे.

कान फेस्टिवल मध्ये कंगना रनौत, प्रियंका चोपड़ा, ऐश्वर्या राय आणि टीवी एक्ट्रेस हिना खान सहभागी होत्या. सगळ्यांचा लुक मीडिया समोर आला पण ऐश्वर्याचा लुक आणखी देखील समोर आलेला नाहीये. त्यावेळी कंगना ने गोल्ड कांजीवरम साडी आणि पेपल्म ब्लाउज घातले होते व प्रियंका ब्लैक कलरच्या हाई स्लिट गाउन मध्ये दसून आली. आता चाहत्यांना फक्त ऐश्वर्याच्या लुकची ओढ लागली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like