दीपिकांच्या सासरेबुवांची सुनबाईंवर भन्नाट शेरेबाजी

वृत्तसंस्था – दीपिका रणवीर यांच्या लग्नात त्यांच्या घरचे जाम खुश दिसतायेत. त्याच झालं असं कि होणार सून मी त्या घरची असं  म्हणत म्हणत दीपिका एकदाची भवानी कुटुंबाची सून झाली खरी. दीपिकासारखी सून मिळाली म्हटल्यावर भवानी फॅमिली भलतीच खुश आहे.  दीपिकासाठी खुद्द सासरेबुवांनी शेरेबाजीच केली. ”ये दिवाणी तो भवानी हो गई ” असं म्हणत त्यांनी दीपिकाला चिडवले.

रणवीरची हेअर स्टाईलिस्ट निताशा गौरव हिने तिच्या इंस्टाग्राम वर हि गोष्ट शेअर केली. दिपवीरुचं लग्न कोकणी आणि सिंधी दोन्ही पद्धतीने झालं. अखेर दोघेही सहा वर्षाच्या त्यांच्या रोमँटिक रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत राहिले. अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. दोघांचेही फोटो काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. तरुणाई तर या फोटोंची डोळे लावून वाट पाहत होती. काल अनेकांच्या व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टावर या जोडीचे फोटो ठेवले होते. दीपिका लाल कलरच्या घागऱ्यात अतिशय सुंदर दिसत होती. तिचे दागिने तिच्या साैदर्यात भर घालत होते. रणवीर सुद्धा मरून कलरच्या शेरवानीत अगदी रुबाबदार दिसत होता. अशा शानदार पद्धतीने दिपवीरुचं लग्न पार पडलं. जगभरातून दिपविरुवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. भारतात आल्यावर दिपविरु मोठी रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं कळतंय. लग्नाला मोजक्याच लोकांना आमंत्रित केल्यामुळे या रिसेप्शन सोहळ्याला अनेक कलाकारांची गर्दी असणार यात काही शंका नाही. दिपीकाचं घर ज्या ठिकाणी आहे म्हणजेच बेंगाल मध्ये देखील रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे.

सपना चौधरीची एक झलक पाहण्यासाठी चाहते बेभान ; एकाचा मृत्यू

दीपिका रणवीर लग्नानंतर हनीमूनला कुठे जाणार याबाबतीतही अनेकांना उत्सुकता असल्याचं दिसतंय. मात्र याबाबत दिपविरुनं चांगलीच गुप्तता पाळल्याचं कळतंय. सूत्रांच्या माहितीनुसार लग्नानंतर काहीच दिवसात दिपविरु कामाला लगेचच सुरुवात करणार असल्याचं कळतंय. एका कंडोम कम्पनीने तर वेगळ्याच पद्धतीने दिपवीरूला शुभेच्छा दिल्या. दिपविरुला चाहत्यांकडून ”नांदा सौख्यभरे ” अशाच शुभकामना मिळत आहे.