शहीदांच्या कुटूंबियांना मिळणार्‍या नुकसान भरपाईत ‘चौपट’ वाढ, मोदी सरकारची मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युद्धादरम्यान शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांना आता 8 लाख रुपयांची भरपाई मिळेल. पहिल्यांदा ही रक्कम फक्त 2 लाख रुपये होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या रक्कमेत चौपट वाढ करण्यास सैद्धांतिक मंजूरी दिली आहे. ही रक्कम आर्मी बॅटल कॅज्युअलिटी फंड अंतर्गत देण्यात येईल.

वेलफेअर फंड संरक्षण मंत्रालयाचे एक्स सर्विसमॅन वेलफेअर (ESW) विभागांतर्गत असेल. याची स्थापना जुलै 2017 मध्ये झाली होती. असे असले तरी हा एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आले. हा फंड चॅरिटेबल एंडोवमेंट अ‍ॅक्ट 1890 अंतर्गंत तयार करण्यात आला आहे. फंडसाठी साउथ ब्लॉक ब्रांचचे सिंडिकेट बँकमध्ये अकाऊंट सुरु करण्यात आले. हा अकाऊंट नंबर 90552010165915 आहे.

हा फंड शहीदांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना मिळणाऱ्या विविध योजनापेक्षा वेगळा आहे. याबरोबर पहिल्यापासून मॉनेटरी ग्रांटमध्ये विभिन्न रँकच्या अधिकाऱ्यांसाठी 45 लाखपासून 25 लाख रुपये आणि आर्मी ग्रुप इंश्योरेंसमध्ये 40 लाखापासून 75 लाख रुपयांपर्यंतची तरतूद आहे. या आधी देखील गृहमंत्री असताना राजनाथ सिंह यांनी शहीदांच्या आणि जखमीच्या मदतीसाठी ‘भारत के वीर फंड’ लॉन्च केला होता.

visit : Policenama.com