नौदलासाठी १११ हेलिकॉप्टर खरेदी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नौदलासाठी लवकरच नवी १११ बहुउद्देशीय हेलिकॉप्टर, तसेच सुमारे १५० तोफखाना बंदूक प्रणाली खरेदी केली जाणार आहे. या हेलिकॉप्टर खरेदी करारावर २१ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. नौदलासाठीच्या या ४६ हजार कोटी रुपयांच्या मोठ्या खरेदी प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने शनिवारी मंजुरी दिली.

लष्करासाठी सामग्री खरेदी करण्याचा हा निर्णय लष्कराशी संबंधित खरेदीबाबत निर्णय घेणारी सर्वात मोठी संस्था असलेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या (डीएसी) बैठकीत घेण्यात आला. डीएएसने ११ हेलिकॉप्टर खरेदीला मंजुरी दिली आहे. यात २१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. धोरणात्मक भागीदारीअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा उद्देश मेक इन इंडिया कार्यक्रमाला चालना देणे हा आहे, असे खरेदीबाबत अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a87992ce-a880-11e8-9726-9d4876925d1d’]
या अधिकाऱ्याने सांगितले की, डीएसीने आणखीही काही खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यात सुमारे २४,८७९ कोटी रुपये खर्च होणार आहेत. यात लष्करासाठी १५५मिमीच्या १५० तोफखाना बंदूका खरेदी करण्यात येतील. या बंदूका आपल्याच देशात तयार करण्यात येतील. यावर सुमारे ३,३६४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. याबरोबरच आखूड टप्प्यातील क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. यातील १० प्रणाली स्वदेशी असणार आहेत. ही खरेदी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नौदलाने १११ बहुउद्देशीय आणि १२३ बहुपयोगी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्यासाठी रिक्वेस्ट फॉर इन्फॉर्मेशन (आरएफआय) दिले होते.