Batla House Encounter : दोषी आरिज खानला सुनावली फाशीची शिक्षा; सोशल मीडियावर लोकांनी साजरा केला आनंद

पोलिसनामा ऑनलाईन – बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणामधील दिल्लीच्या साकेत न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खान याला शिक्षा सुनावली आहे. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संदीप यादव यांनी गुन्हेगार म्हणून घोषित झालेल्या आरिज खान याला मृत्यूदंड ठोठावला असून या प्रकरणाला दुर्मिळ मधील दुर्मिळ असे वर्णन केले आहे. याबरोबर 11 लाख रुपयांचा दंडही सुनावला आहे. त्यापैकी 10 लाख मोहन चंद शर्मा यांच्या कुटुंबाला देण्यात येतील. यापूर्वी शहजादला केवळ 2013 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. बाटला हाऊस चकमकीदरम्यान आरिज आणि शहजाद बचावले होते.

साकेत न्यायालयाच्या निर्णयावर सोशल मीडिया आणि राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या चकमकीवर प्रश्न विचारणार्‍या नेत्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. त्याचवेळी ट्विटरवर हॅशटॅश बाटला हाऊस एन्काऊंटर ट्रेंड होत आहे. या ऐतिहासिक निर्णयावर लोक त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. साकेत न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोक केवळ आनंदी नाहीत, तर न्यायाच्या दिशेने असलेले हे एक मोठे पाऊल मानत आहेत. यावर लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

 

 

साकेत न्यायालयाचा निकाल :
न्यायाधीश संदीप यादव यांनी 8 मार्च रोजी आरिजला दोषी ठरवले होते. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी न्यायालयात अपील केले होते की, याप्रकरणी आरिज खानला मृत्युदंड ठोठावण्यात यावा. फाशीच्या शिक्षेस विरोध दर्शविताना आरिज खानचे वकील एमएस खान म्हणाले होते की, आरिज खानचे तरुण वय लक्षात घेता सवलत देण्यात यावी. आरिज खानला चकमकीच्या 10 वर्षांनंतर फेब्रुवारी 2018 मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणात साकेत न्यायालयाने जुलै 2013 मध्येच अरिसाचा साथीदार शहजाद अहमद याला दोषी ठरवले आहे.