दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उद्या नांदेड दौऱ्यावर

नांदेड : पोलीसनामा आॅनलाइन (माधव मेकेवाड) – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया उद्या शुक्रवार (ता.१६) रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.
सिसोदिया यांचे सकाळी १०:३० वाजता नांदेड विमानतळावर आगमन होणार असून ते शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत. त्यानंतर ११ वाजता साहिबजादा बाबा फत्तेसिंघजी मंगल कार्यालय हर्षनगर येथे नियोजीत कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. १२:३० वाजता परत शासकीय विश्रामगृह येथे येणार असून दुपारी ०१:३० वाजता महात्मा फुले शिक्षक संघटनेसोबत बैठकीला उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर ०२:१५ वा विमानतळाकडे रवाना होणार आहेत, तर ०३:२० वाजता विमानाने हैद्राबादकडे रवाना होणार आहेत. सिसोदिया यांचा जवळपास पाच तासाचा नांदेड दौरा असणार आहे. आम आदमी पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागताची तयारी करत आहेत. सिसोदिया यांच्या नांदेड दाैऱ्याने राजकीय चर्चेला उधान आले आहे.

लोकसभा निवडणुकी पूर्वी आणखी एक सर्जिकल स्‍ट्राईक होणार ?