दिल्ली सरकारचा मोठा निर्णय ! कार्यालयांमध्ये आता काम करणार 100 % अधिकारी आणि कर्मचारी

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने (Delhi government ) शुक्रवारी रात्री उशीरा एक मोठा निर्णय घेतला. कोरोना संसर्गामुळे सरकारी आणि अन्य कार्यालयामध्ये 25 ते 50 टक्के स्टाफ काम करत होता, आता सरकारने 100 टक्के स्टाफला कार्यालयात येण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली सरकारचा (Delhi government ) आदेश शनिवारपासून लागू होईल. माहितीनुसार, दिल्ली सरकार व दिल्लीतील सर्व सरकारी कार्यालये, संस्था, महामंडळे आणि खासगी संस्थांमध्ये हे नियम लागू मानले जातील.

यापूर्वी केजरीवाल सरकारने कोरोना प्रकरणे कमी झाल्याचे पहाता 115 खासगी हॉस्पीटलना कोविड वॉर्ड आणि आयसीयूमध्ये बेड कमी करण्याचे आदेश दिले होते. दिल्लीच्या आरोग्य विभागानुसार, राष्ट्रीय राजधानीत मागील 24 तासात कोरोनाची 340 नवीन प्रकरणे सापडली आहेत. यासोबतच गुरुवारी 390 रूग्णांनी संसर्गातून रिकव्हरी केली. तर कोरोना संक्रमित 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना संसर्गाची आतापर्यंत एकुण 6,31,589 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी 6,17,930 ची रिकव्हरी झाली आहे. दिल्लीत कोरोनाने झालेल्या मृत्यूचा आकडा 10,722 पर्यंत पोहचला आहे. यानंतर सक्रिय प्रकरणे 2,937 आहेत.