Unlock 4 मध्ये उघडू शकतात बार, जाणून घ्या सिनेमा हॉल अन् शाळा-कॉलेजचं काय होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ सप्टेंबरपासून लॉकडाउनमध्ये ‘अनलॉक ४’ चा चौथा टप्पा सुरू होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘अनलॉक ४’ मध्ये सरकार मेट्रो ट्रेन सेवा पुन्हा सुरू करू शकते. मात्र शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणतीही शक्यता नाकारली गेली आहे. बार चालकांनाही त्यांच्या काउंटरवर दारू विक्रीस परवानगी दिली जाऊ शकते, परंतु ग्राहकांना ती घरी नेण्याची परवानगी दिली जाईल. बार उघडण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही.

याबाबत सविस्तर माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा ‘अनलॉक ४’ सुरू होईल, तेव्हा मेट्रो रेल सेवांना १ सप्टेंबरपासून ऑपरेट करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र राज्यात परिवहन सेवा सुरु करण्याबाबत सांगितले गेले आहे की, संबंधित राज्य सरकार केवळ राज्यांमधील कोरोना विषाणू महामारीच्या परिस्थितीच्या आधारेच तेथील परिचालनाचा निर्णय घेतील.

मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मेट्रो सेवा निलंबित करण्यात आल्या होत्या. या महामारीमुळे देशात आतापर्यंत ३१ लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

शाळा सुरू करण्याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, तात्काळ शाळा व महाविद्यालये उघडली जाणार नाहीत. मात्र विद्यापीठे, आयआयटी आणि आयआयएमसारख्या उच्च शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी द्यायची की नाही, यावर विचार चालू आहे.

थिएटरसंदर्भात आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, १ सप्टेंबरपासून थिएटर्स सुरू होण्याची शक्यता जवळपास नाही. कारण फिल्ममेकर्स किंवा सिनेमा मालकांना एकमेकांपासून अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन करून त्यांचे व्यवसाय कार्य करणे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही.

अनलॉक ४ च्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकार केवळ प्रतिबंधित कामांविषयीच बोलेल. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारे त्या अतिरिक्त कामांवर अंतिम निर्णय घेऊ शकतात, ज्यांच्यावर अनलॉक ४ दरम्यानही बंदी कायम राहील.

अनलॉक ४ संबंधित मार्गदर्शक तत्त्वे या आठवड्याच्या अखेरीस जारी केली जाऊ शकतात. सध्या मेट्रो सेवा, थिएटर, स्विमिंग पूल, मनोरंजन उद्याने, बार, सभागृह, इतर सभागृह आणि अशी इतर सर्व ठिकाणे बंद आहेत.