दिल्लीला हादरवण्याचा मोठा कट पोलिसांनी हाणून पाडला, दोघांना ठोकल्या बेड्या 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये 15 आॅगस्ट रोजी साजरा होणाऱ्या स्वतंत्र्य दिनाची जय्यत  तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह सर्वच राज्यांना इशारा देण्यात आला असून, अनेक महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे. अशातच दिल्लीला हादरवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

दिल्ली पोलिसांनी कारवाई करत हत्यारांसह दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात दारुगोळा देखील हस्तगत करण्यात आला आहे. महम्मद अजिम आणि आस मोहम्मद असं या दोन आरोपींची नावे आहेत. यावेळी पोलिसांनी दोन कार्बाइन,50 पिस्तूल आणि 50 काडतूसं असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मागील 4 दिवसापूर्वीच दिल्ली पोलिसांनी भारतात हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला अटक केली होती. जम्मूच्या गांधी नगर भागातून या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. याच्याकडून देखील मोठा दारूसाठा जप्त केला होता.

 [amazon_link asins=’B00Y6EHHQ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b70808e-9bdf-11e8-bf4e-4b9b019f64d8′]
स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरु असताना सुरक्षा यंत्रणा चिंतेत आहेत. सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाला दिल्लीत हल्ला करण्य़ाची दहशतवाद्यांची तयारी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यामुळे सगळीकडे सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B00NLEBXEY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ab57fc8-9bdf-11e8-be86-079344d64ef2′]