पोलिसांचा इशारा ! Facebook, Twitter वर चुकूनही करू नका ‘हे’ काम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  आजकाल आपण सर्वच जण फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचा वापर आहोत. आपण अनेकदा या प्लॅटफॉर्म्सवर रिव्ह्यूदेखील देत असतो. जर तुम्ही खराब वस्तू किंवा कोणत्या सर्व्हिसबाबत सोशल मीडियावर व्यक्त होत असाल तर दिल्ली पोलिसांनी एक इशारा दिला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती देत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

आपण जर फेसबुक, ट्विटरसारख्या सार्वजनिक मंचांवर आपल्या तक्रारी पोस्ट करत असाल सावधगिरी बाळगा. जर तुम्ही वॉलेट, बँक अ‍ॅप्स आणि एअरलाईन्ससारख्या कंपन्यांना तक्रारी लिहित असाल तर तुमची फसवणुकही होऊ शकते. याद्वारे कोणतीही व्यक्ती त्या तक्रारींचा हवाला देऊन कस्टमर केअर एक्सिक्य़ुटिव्ह म्हणून तुम्हाला कॉल करून आपली खासगी माहिती मिळवली जाऊ शकते. त्या आधारे तुमचे बॅंक खात्यातून पैसै चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम ब्रान्चने म्हटले आहे. दरम्यान, ग्राहकांना कोणतीही तक्रार किंवा समस्या मांडायच्या असतील तर संबंधित कंपनीच्या ईमेल आयडीवर किंवा त्यांच्या कस्टमर केअरवर संपर्क केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.