नव्या आयफोनची मागणी घटली 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अॅपलचे वेड जगभराबरोबरच भारताला लागले आहे. पण, सध्या आयफोनची क्रेझ विरल्याचे चित्र सध्या भारतीय बाजार पेठेत दिसत आहे. अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचे समोर आले आहे. यावेळेस विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33edf99f-c62a-11e8-9a15-990713710a8c’]

भारत नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी कमी झाल्याचे अनेक विक्रेत्यांनीही मान्य केले आहे. यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. मात्र यावेळी चित्र बदले आहे. अॅपलने लाखांच्या संख्येने युनिट भारतात पाठवले आहेत, जेणेकरुन फोनची विक्री करताना तुटवडा निर्माण होणार नाही. पण यावेळी विक्रीही वाढलेली नाही आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Bigg Boss चा धमाका…. अनुप-जसलीनचे ब्रेकअप!

आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 8 ची मागणी या वर्षीच्या मॉडेल्सपेक्षा किती तरी अधिक आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, या स्टोअर्समध्ये 40 ते 50 टक्के स्टॉक विक्रीविना पडून आहे. भारतात यावेळी आयफोन XS आणि XS मॅक्सची विक्री केवळ 50 ते 60 टक्के झाली, जी गेल्या वर्षीच्या आयफोन X ची केवळ तीन दिवसात झाली होती. तुलनेने आयफोन XS ची मागणी जास्त आहे, जो 256 जीबी व्हेरिएंटमध्ये आहे. फोनची किंमत जवळपास 1 लाख 24 हजार 900 रुपये इतकी आहे. अॅपलने आयफोन XS आणि XS मॅक्स गेल्या शुक्रवारी भारतात लाँच केला. तर गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन X ची किंमत 89 हजार रुपयांपासून ते 1.02 लाखापर्यंत होती. भारतात अॅपल प्रीमियम रिसेलरचे जवळपास 1500 स्टोअर्स आहेत.

[amazon_link asins=’B0719KYGMQ,B0714DP3BG,B01NCN4ICO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a49982f3-c62a-11e8-a1b1-39b02f71006a’]

जाहीरात

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like