Deputy Collector Santosh Deshmukh | कोव्हिड काळात परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केले – उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोव्हिड (Covid 19) काळामध्ये सर्व परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख (Deputy Collector Santosh Deshmukh) यांनी केले. पूना हॉस्पिटल (Poona Hospital) रसिकलाल एम धारीवाल नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या (Rasiklal M Dhariwal Nursing Institute) प्रशिक्षणार्थी परिचारिकांचा (Trainee Nurses) प्रशस्तीपत्र प्रदान सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करुन झाली. यानंतरच्या कार्यक्रमाची सुरुवात शपथग्रहण समारंभाने झाली.

 

उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख (Deputy Collector Santosh Deshmukh) म्हणाले, कोव्हीड साथीच्या काळात मी अनेक कोव्हीड केंद्रांचा मुख्य अधिकारी होतो. या काळात सर्व परिचारिकांनी निष्ठेने व समर्पण भावनेने काम केले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान समारंभात मला आज माझ्या पदवीप्रदान समारंभाची आठवण झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

 

नर्सिंग अधीक्षक सुशीला आनंद (Nursing Superintendent Sushila Anand) यांनी संस्थेच्या कामगिरीचा आलेख मांडला. त्या म्हणाल्या की, व्यावसायिक कौशल्य तर आवश्यक आहेच. पण माणुसकीची जाणीव आणि कोमलता यामुळे हा व्यवसाय अधिक अर्थपूर्ण होतो.

 

या कार्यक्रमाला पूना हॉस्पिटल अध्यक्ष देवीचंद जैन (Devichand Jain),
पूना हॉस्पिटल उपाध्यक्ष डाह्याभाई शहा (Dahyabhai Shah), कार्यकारी विश्वस्त राजकुमार चोरडिया (Rajkumar Chordia),
सह कार्यकारी विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया (Purushottam Lohia), विश्वस्त भबुतमल जैन (Bhabutmal Jain),
राजेश शहा (Rajesh Shah), नैनेश नंदु (Nainesh Nandu), अशोक ओसवाल (Ashok Oswal),
पूना हॉस्पिटल सी. ई. ओ डॉ. जे. रविंद्रनाथ (Poona Hospital CEO Dr. J. Rabindranath) उपस्थित होते.

 

Web Title :- Deputy Collector Santosh Deshmukh | During the Covid period the nurses worked with loyalty and dedication Deputy Collector Santosh Deshmukh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा