DES-NEMS School Gathering | ‘संवाद हिच समस्या टाळण्याची गुरुकिल्ली’ – डॉ रोहिणी पटवर्धन

एनईएमएस शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे; पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे ‘रिश्ते’ संकल्पनेवर उत्कृष्ट सादरीकरण

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – DES-NEMS School Gathering | लहान मुलांमधील भावनिक आणि मानसिक समस्या टाळायच्या असतील तर पालकांनी मुलांशी संवाद साधायला हवा. असे प्रतिपादन एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन (Dr. Rohini Patwardhan) यांनी केले. (DES-NEMS School Gathering)

 

न्यू इंग्लिश मिडियम स्कुलच्या (एनईएमएस) इयत्ता पहिली ते तिसरीचे वार्षिक स्नेहसंमेलन टिळक स्मारक सभागृहात (Tilak Smarak Mandir) उत्साहात पार पडले. इयत्ता पहिली ते तिसरीच्या चिमुकल्यांनी ‘रिश्ते’ या विषयावर नाटिका, गीत, नृत्य आदी सादर केले. एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रोहिणी पटवर्धन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, विभक्त कुटुंब संस्कृती वाढल्यामुळे लहान मुलांना वेगवेगळ्या नात्यांचे महत्च समजणे गरजेचे आहे. मुलांच्या भावनिक विकासात आजी आजोबा महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळाले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. (DES-NEMS School Gathering)

 

 

यावेळी मुलांनी सादरीकरणात विद्यार्थांनी मानवी नात्यांसोबतच निसर्गाशी नाते, मित्र मैत्रीणींशी नात्यांचे विविध पैलू उलगडून दाखवले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, सोसायटीच्या शाळा समितीच्या सदस्या डॉ सविता केळकर, अ‍ॅड. राजश्री ठकार, एनईएमएस शाळेचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पालांडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अर्चना धनावडे आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेच्या शिक्षिका दिपाली ठाकर आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थांनी केले.
कार्यक्रमाची प्रकाश व्यवस्था प्रमोद उकिरडे आणि ध्वनी व्यवस्था अश्विनी पटवर्धन यांनी पाहिली.
शिक्षिका ज्योती पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Web Title :- DES-NEMS School Gathering | ‘Communication is the key to avoid problems’ – Dr Rohini Patwardhan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा