Amol Mitkari | ‘लवकरच एकनाथ शिंदे आणि पार्टीचा भाजप राजकीय गेम करणार’ – अमोल मिटकरी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे आयोजित संत जगनाडे महाराज पुण्यतिधी कार्यक्रमात एक राजकीय विधान केले. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. तसेच मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य केले आहे. बावनकुळेंच्या आणि भाजपच्या विविध नेत्यांच्या विधानावरून हे स्पष्ट होत आहे, की एकनाथ शिंदे यांना भाजप कवडीची किंमत देत नाही, असे अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

 

 

बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ अगदी सोपा आहे. चंद्रकांत पाटील देखील देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत, असे एका सभेत बोलले होते. आज बावनकुळे बोलले आहेत. स्वत: एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून संबोधले होते. याचाच अर्थ असा की, एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भाजपला शरण गेला आहे. भाजपच्या मनात आहे, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा शिंदे गट आणि महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करावा, असे मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

उद्या नागपुरात अधिवेशन आहे. आणि आज प्रदेशाध्यक्षांचे हे विधान समोर आले आहे. यावरून त्यांना शिंदेचे नेतृत्व मान्य नाही, हेच स्पष्ट होत आहे. लवकरच एकनाथ शिंदे आणि गटाचा राजकीय गेम करून भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्तारूढ व्हायचे आहे. त्यासाठी ते आसुसले आहेत. ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होईल, त्यादिवशी हे सरकार कोसळलेले असेल. संजय राऊत देखील म्हणाले आहेत, की फेब्रुवारी महिना हे सरकार पाहणार नाही. बावनकुळेंच्या विधानाने ठिणगी पडली आहे. आणि यांचा प्रवास त्याच दिशेने सुरू आहे, असे मिटकरींनी नमूद केले.

 

 

 

Web Title :- Amol Mitkari | soon political game of eknath shinde and shinde group
amol mitkaris statement in the background of- chandrasekhar bavkules statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा