पत्नीला घरातील काम सांगणे म्हणजे वाईट वागणूक नव्हे : न्यायालय 

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईन

पत्नीला घरातील कामे करण्यास सांगणे तसेच रुचकर स्वयंपाक बनव म्हणणे म्हणजे वाईट वागणूक दिली असं होत नाही. असे स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयाने  व्यक्त  केले आहे. हा निर्णय एका महिलेच्या आत्महत्येच्या एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १७ वर्षांपूर्वी दाखल खटल्यातून पती आणि त्याच्या आई-वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bce104d2-998a-11e8-b535-677fb2cf6d8f’]

नवऱ्याचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध आणि सासरकडून होणार छळ या सर्व त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने विष प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट केला असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या प्रकरणावर उच्चन्यायालयात सुनावणी झाली. घरातील कामे करण्यास सांगणे आणि पत्नीला रुचकर स्वयंपाक बनवायला सांगणे याचा अर्थ तिला कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक दिली असं  होत नाही. असे मत न्यायमूर्ती सारंग कोटवाल यांनी व्यक्त केले.

याचिकाकर्त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नसल्याने या व्यक्तीचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्याचे सिद्ध होऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितलं. विजय शिंदे आणि महिलेचा विवाह १९९८ साली झाला. त्यानंतर तीन वर्षांनी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती.