Honeytrap चे देशी ‘व्हर्जन’ ! महिलेनं प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करून जवळ बोलावलं प्रौढाला, कापला त्याचा प्रायव्हेट पार्ट

मुजफ्फरपुर : जिल्ह्याच्या साहेबगंज तालुक्यातील विशुनपुर पट्टी मुशहर टोला येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका मध्यमवयीन व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. पीडित हरिंदर मांझी यास गंभीर आवस्थेत स्थानिक सार्वजनिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जिथे त्याची गंभीर स्थिती पाहून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी मुजफ्फरपुर येथे हलविण्यास सांगितले. तिथे सुद्धा त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एएसआय घटनास्थळी पोहचले आणि आरोपी महिलेला ताब्यात घेतले. मात्र, महिलेचा साथीदार पळून गेला आहे.

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले 
साहेबगंजमध्ये हनीट्रॅपचे वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथील विशुनपुर पट्टी मुशहर टोला रेल्वे लाईनजवळ पीडित हरिंदर मांझीने एका महिलेला तिच्या प्रियकरासोबत नको त्या आवस्थेत पाहिले. यानंतर त्या महिलेला चिंता सतावू लागली की हरिंदर आपले बिंग फोडू शकतो. बदनामी टाळण्यासाठी तिने एक कट रचला. अगोदर प्रेमळपणे बोलत तिने ही गोष्ट कुणाला सांगू नकोस असे म्हटले. त्याला पूर्ण विश्वासात घेतले. जेव्हा तिला समजले की त्यास कोणत्याही प्रकारचा संशय नाही तेव्हा त्याला आपल्या जवळ बोलावले. तो तिच्या जवळ जाताच महिलेने प्रियकराच्या मदतीने त्याचा प्रायव्हेट पार्ट विळ्याने कापला.

यानंतर दोघे तिथून पळून गेले. पीडित हरिंदरचे किंचाळणे ऐकून जवळचे लोक धावत आले, त्यांनी त्यास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महिलेबाबत सांगितले जात आहे की, तिने दोन विवाह केले आहेत, परंतु सासरी जात नाही. माहेरी राहते. त्यानंतर अशाप्रकारची घटना समोर आल्यानंतर आजूबाजूचे लोक सुद्धा हादरले आहेत.