Desirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची भूमिका

मुंबई, ता. १० : पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर विशेष चर्चेत आली. आणि वर्षभर ती निरनिराळ्या परिस्थितीतून गेली आहे. तर आता ती स्वतःला या परिस्थितून सावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. व काम मिळवण्याचाही प्रयत्न करत आहे. नुकतीच रियाची सर्वात आकर्षक महिलांमध्ये (Desirable Women) निवड झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे सगळीकडे रियाची चर्चा आहे. दरम्यान, टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन (Desirable Woman) म्हणून रियाचही नाव समोर आलं होतं.

ही निवड सुंदरता किंवा लुक्सवर आधारीत नाही. तर ती व्यक्ती किती चर्चेत राहिली व लोकांनी त्या व्यक्तिचा किती विचार केला यावर आधारीत असते. पण त्यानंतर रियाला काही चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्याचं समोर येत आहे.

महाभारत कथेवर आधारीत एका चित्रपटासाठी रियाला दौपदीचा रोल ऑफर करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

‘हा महाभारत आणि दौपदीच्या कथेवर आधारीत आहे. तसेच तो आगळा वेगळा चित्रपट असणार आहे.

हा असा चित्रपट असणार आहे जो कधीही झाला नाही. तर दौपदीची भूमिका रियाला देण्यासाठी तिच्यासोबत बोलणी सुरू आहे.

पण अद्याप चित्रपट हा सुरुवातीच्याच टप्प्यात आहे. वेगळ्या आणि आधुनिक जगातील ही कथा असणार आहे.

मागील वर्षीच्या सगळ्या प्रकरणानंतर रिया मीडिया तसेच सोशल मीडिया या सगळ्यांपासून फार दूर होती.

मात्र, आता रिया पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय होताना पाहायला मिळत आहे.

पण आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करायलाही सुरूवात केली आहे.

‘कशी मोठ्या संकटानंतर मोठी ताकद मिळते’ असं तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे. यानंतर तिच्या फॉलोवर्सने तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Also Read This : 

 

Maratha Reservation | ‘एकच मिशन, मराठ्यांचं ओबीसीकरण’ ! मराठा संघटनेची मागणी

 

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय

 

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले – ‘महाराष्ट्राच्या हिताची तडजोड होणारा कोणताही निर्णय घेणार नाही’

 

मासिकपाळीत जास्त वेदना आणि रक्तस्त्राव, गर्भाशय ग्रीवाचा कर्करोग आहे का?, जाणून घ्या

 

Buildings Risk of Collapse in Mumbai | मुंबईतील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी MHADA कडून जाहीर

 

मुलांना चांदीच्या भांड्यात खायला देणेठरेल फायदेशीर, होतील ‘हे’ फायदे