राज्य पोलिस दलात बदल्या अन् बढत्याचं रॅकेट

पोलीसनामा ऑनलाईन – राज्याच्या पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसाठी काम करणारे मोठ रॅकेट तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी उघडकीस आणला होता. मात्र या अहवालावर मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी कोणतीची कारवाई केली झाला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सदर अहवाल फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवाकडे सोपवत सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

राज्य पोलीस दलात पैसे घेऊन बदल्या केले जात असल्याची माहिती रश्मी शुल्का यांनी ऑगस्ट 25 ऑगस्ट 2020 मध्ये पोलीस महासंचालकांना दिली होती. बदल्यांच्या या रॅकेटमध्ये अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्यांची नावे होती. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी ही माहिती तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवली होती. मात्र याबाबत गृहमंत्रालयाने कारवाई करण्याऐवजी माहिती देणा-या अधिका-यालाच बाजूला केले. बदल्यांच्या रॅकेटचे गांभीर्य लक्षात घेता याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.