Devendra Fadnavis | ‘माझं बोलणं शरद पवारांना अस्वस्थ करणारं होतं, म्हणून…’, देवेंद्र फडणवीसांचं खोचक प्रत्युत्तर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यात दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहे. आधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवार यांना मुत्सद्देगिरीवरुन टोला लगावला. त्यानंतर शरद पवार यांनी फडणवीसांच्या विधानाचा पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. आता मध्यमांशी बोलताना पुन्हा फडणवीस यांनी शरद पवारांना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांना लक्ष्य करताना 1977 साली स्थापन केलेल्या सरकारचा संदर्भ दिला. 1978 मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांच्या मंत्रिमंडळातील 40 आमदार (MLA) घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी त्यावेळच्या भाजपाबरोबर (BJP) सरकार स्थापन केले. ते सरकार दोन वर्षे चालले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी (PM Indira Gandhi) ते सरकार बरखास्त केले नसते तर ते सरकार पाच वर्षे चालले असते. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केले ते ‘मुत्सेद्देगिरी’ आणि तेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले तर गद्दारी? असं कसं चालेल? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

तेव्हा फडणवीस लहान असतील

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देताना खोचक टोला लगावला. मी कधी मुत्सद्देगिरी केली? त्यांनी सांगावं. 1977 साली आम्ही सरकार बनवलं. पण त्यावेळी भाजप माझ्यासोबत होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस लहान असतील. त्यामुळे त्यांना कळलं नसेल. त्यांना कदाचित पुरेसा इतिहास माहिती नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी सगळ्यांना घेऊन सरकार बनवलं होतं. त्यावेळच्या जनसंघाचे उत्तमराव पाटील (DyCM Uttamrao Patil) उपमुख्यमंत्री होते. इतरही काही सदस्य होते, मला वाटतं देवेंद्र फडणवीस कदाचित तेव्हा प्राथमिक शाळेत (Primary School) असतील. त्यामुळे त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा काही फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी लगावला.

शरद पवार म्हणाले ते खरं आहे

शरद पवार यांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत संवाद साधताना पुन्हा टोला लगावला. शरद पवार म्हणाले ते खरं आहे की 1977 मध्ये मी प्राथमिक शाळेतच होतो. पण मी काल जे बोललो, ते एकतर शरद पवारांनी ऐकलं नाही किंवा ऐकलं तरी ते त्यांना अस्वस्थ करणारं होतं. म्हणून त्यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला, असं फडणवीस म्हणाले.

त्यांची मुत्सद्देगिरी आणि शिंदेंची बेईमानी कशी?

1978 साली शरद पवार वसंतदादा पाटलांबरोबर ते मंत्री होते.
त्यावेळी काँग्रेस पक्ष (Congress Party) फोडला. त्यातले 40 लोक बाहेर काढले आणि
भाजपासोबत त्यांनी सरकार तयार केले. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तर आमच्याबरोबरच निवडून आले होते. ते तिथून 50 लोक घेऊन बाहेर पडले. त्यांनी आमच्याबरोबर सरकार स्थापन केलं. मग शरद पवारांनी तयार केलेलं सरकार ही मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी तयार केलेलं सरकार ही बेईमानी कशी होऊ शकते? मी कुठेही शरद पवारांनी बेईमानी केली असं म्हटलं नाही. एकनाथ शिंदेंची केस तर मेरिटची आहे. शिंदे आमच्यासोबत युतीत निवडून आले. शरद पवार तर काँग्रेससोबत निवडून आले आणि नंतर भाजपसोबत आले, असंही फडणवीस म्हणाले.

इतिहासात लिहून ठेवलं की…

माझं म्हणणं एवढंच आहे की मी प्राथमिक शाळेत होतो की जन्माला यायचा होतो, त्यामुळे इतिहास बदलत नाही.
कुणीही जन्माला आलं, नाही आलं, कधी आलं यावर इतिहास ठरत नसतो.
इतिहासात हे लिहून ठेवलं आहे की शरद पवारांच्या नेतृत्वाखालील 40 लोकांनी वसंतदादांचे सरकार पाडलं
आणि भाजपसोबत सरकार तयार केलं, तेच मी सांगितलंय, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

 

Web Title :  Devendra Fadnavis | bjp leader devendra-fadnavis-mocks-sharad-pawar-comment-on-1977-government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा