Devendra Fadnavis | अमरावतीतील दंगा राहूल गांधी यांच्या ट्विटनंतर; फडणवीस यांचा गंभीर आरोप

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | ज्येष्ठ हिंदुत्ववादी व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या साठीनिमित्त आयोजित सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळ्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, भीमा-कोरेगावमध्ये जे साहित्य मिळाले त्यामध्ये चीन, आयएसआय, कशी मदत करत होते हे पोलिसांनी सिद्ध केले. एवढेच नाही तर पोलिसांनी डाव्या विषवल्लीचा बुरखा फाडून टाकला. त्याचप्रमाणे अमरावतीत जो दंगा झाला तो राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ट्विटनंतरच असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला आहे.

या कार्यक्रमात फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवरही (Shivsena) टीका केली. ते म्हणाले, स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या, अशी मागणी जे कालपरवापर्यंत करत होते. ते आज सावरकरांचे राष्ट्रासाठी दिलेले योगदान समजू न शकणाऱ्या विचारांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. शिवसेनेचे निलंबित खासदार सावरकरांबद्दल बोलले त्यांना काय सांगणार ? असा प्रश्न करत सावरकरांसारखे होण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो.

माता पिता गुरू यांचे ऋण फेडता येत नाही. ५० व्या पुस्तकाचे आकलन लगेच व्हावे म्हणून ‘डावी विषवल्ली’ असे नाव दिले गेले आहे. सर्वात क्रूर कोण असे विचारल्यास हिटलरचे नाव सांगितले जाते. पण, माओनीचे नाव का घेतले जात नाही, असे पुरस्काराला उत्तर देताना शेवडे म्हणाले.

Web Title : Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis serious allegation riot amravati after rahul gandhis tweet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये