Devendra Fadnavis | ‘चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले माहित नाही’

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  चिक्की घोटाळ्याबाबत (Chikki Scam) न्यायालय (Court) काय म्हणाले आहे मला माहित नाही. माहिती घ्यावी लागेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. साकीब गोरे (Sakib Gore) यांच्या दृष्टी संवर्धन कार्यावर लघुपटाचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पत्रकारांनी चिक्की घोटाळ्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत (Ekatmik Bal Vikas Yojana) पाच वर्षापूर्वी झालेल्या निकृष्ट दर्जाच्या चिक्की वाटप घोटाळ्यात अद्यापही खासगी पुरवठादारांवर (Private Suppliers)
एफआयआर दाखल (FIR) का केला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला विचारला आहे.
त्यामुळे भाजपचे सरकार (BJP government) असताना झालेल्या या घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरु होण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात काम करणाऱ्या लोकांना रचनात्मक काम करत नाही तोपर्यंत लोकप्रियता मिळत नाही. या लघुपटातील चेहरे बोलके होते.
आमच्या सरकारमध्ये महाराष्ट्र मोतीबिंदू (Cataract) मुक्त करण्याचे ठरवले होते.
आम्ही साडे सतरा लाख लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन करायचा मानस केला होता.
साडे पंधरा लाख लोकांचे ऑपरेशन आम्ही केले, असेही फडणवीस म्हणाले.

 

Web Title: Devendra Fadnavis | dont know what court said about chikki scam devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Delta Plus Variant | महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या’ बळींची संख्या 3; लस घेतलेल्या महिलेचा देखील मुंबईत मृत्यू

Abdominal Cavity | डॉक्टरांनी गर्भाशयाऐवजी उदर पोकळीत विकसित झालेल्या बाळाचा जन्म केला शक्य

Union Home Ministers Medal – 2021 | महाराष्ट्रातील ‘या’ 11 पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ जाहीर