Devendra Fadnavis | रिफायनरी प्रकल्पाला कोणी विरोध केला, जे आता बोलतायत त्यांनीच गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेलं; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vendanta Foxconn Project) राज्यात वातावरण तापलं असताना यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका केली. फॉक्सकॉनच्या अग्रवाल यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देतो असे त्यांना सांगितले. पण तोपर्यंत त्यांचा गुजरातसोबत करार (Agreement) झाला होता. आमचे सरकार येण्याआधी तो करार होता. परंतु, यावरुन आता काही जण बोलत आहेत, बोलणाऱ्यांनी आपले कर्तृत्व सांगावे, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला गुजरातच्या (Gujarat) मागे नेले. मात्र आम्ही राज्याला पुन्हा एक नंबरवर आणू, असे मत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले.

मुंबईत लघु उद्योग भरती प्रदेश अधिवेशनाचे (Small Business Recruitment Region Convention) आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) जोरदार टीका केली. मविआ सरकारने राज्याला गुजरातच्या मागे नेले. मात्र, आता आम्ही पुन्हा राज्याल नंबर एकवर नेऊ. अनेकदा गुजरातची चर्चा होते, अलीकडे तर जास्तच होते. आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. परंतु 2017 ला आपण पहिल्या क्रमांकावर होतो. दुर्दैवाने आपण दोन वर्षात मागे गेलो. आता जे बोलत आहेत त्यांनी गुजरातला पहिल्या क्रमांकावर नेले, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) देखील फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आपल्याकडे रिफायनरी येणार होती.
त्यातून तीन लाख 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक (Investment) होणार होती. 5 लाख रोजगार येणार होते.
रिफायनरी तयार झाली असती तर राज्य 10 वर्षे पुढे गेले असते. पण त्याला विरोध झाला.
मोठी गुंतवणूक आपण घालवली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा हा लघु उद्योग आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती ही लघु उद्योगाच्या माध्यमातून होते.
विशेषता आपण जेव्हा मोठ्या उद्योगाचा विचार करतो.
त्यावेळी त्या मोठ्या उद्योगालाही संपूर्ण पूरकता ही लघु उद्योगामुळे येते.
म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लघु उद्योगाला फार जास्त महत्त्व दिलं आहे.
कोरोना काळातही विविध योजनांच्या माध्यमातून या उद्योगाला पाठबळ देण्याचं काम केलं आहे.
महाराष्ट्रातही आमचा हाच प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Web Title :- Devendra Fadnavis | Gujarat cannot be defeated by just giving speeches against gujarat devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Andheri East Bypoll | महाविकास आघाडीत बिघाडी ! अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार?

NCP Supriya Sule On Shinde-Fadnavis Govt | स्वार्थी शिंदे-फडणवीसांनी खुर्चीसाठी दीड-दोन लाख बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळविला – सुप्रिया सुळे

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde | आता नवरात्रीत 450 मंडळाचा रेकॉर्ड, गरागरा गरागरा फिरायचेय…; CM शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंची जाहीर भाषणात फटकेबाजी